श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळाचा स्व. महेंद्रभाई शाह
स्मृती गौरव पुरस्काराचे यंदाचे मानकरी राजेश शाह
सोलापूर : सोलापूर गुजराती मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष व ट्रस्टी स्व. महेंद्रभाई लक्ष्मीचंद शाह यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे मानकरी पुरस्कार पुण्याचे प्रसिध्द समाजसेवक राजेश शाह ठरले आहेत. या नावाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष मुकेशभाई मेहता यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सचिव जयेश पटेल यांनी दिली.
सोलापूर गुजराती मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष व ट्रस्टी स्व. महेंद्रभाई लक्ष्मीचंद शाह यांच्या स्मरणार्थ गत ०७ वर्षापासून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील नामांकित गुजराती व्यक्तींना पुरस्कार देण्याची सुरुवात करण्यात आली. पहिला पुरस्कार जन्मभुमीचे दैनिकाचे संपादक कुन्दनभाई व्यास , दुसरा पुरस्कार मुंबईचे समाजसेवी हरखचंदभाई सावला , तीसरा नाशीक स्तिथ सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्त्या सौ. अंजनाबेन जोशी, चौथा मुंबईचे साहित्यीक प्रविणभाई सोळंकी, पाचवा यवतमाळचे डॉ. अनिलभाई पटेल, सहावा प्रसिध्द वैज्ञानिक डॉ. जे. जे. रावळ (मुंबई) व सातवा अभिनेत्री पद्रमश्री सरीता जोशी यांना प्रदान करण्यात आला असल्याचे जयेश पटेल यांनी प्रारंभी सांगितले.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी, २४ डिसेंबर रोजी स. १०.३० वा. गुजरात भवनच्या वातानुकुलीत हॉलमध्ये होणार असल्याचेही सचिव पटेल यांनी शेवटी म्हटले.
स्व. महेंद्रभाई शाह यांच्याविषयी थोडेसे
स्व. महेंद्रभाई शाह यांनी गुजराती समाज उत्कर्षासाठी अथक परीश्रम घेतले. त्यांच्या कार्यकाळात मंडळाने सुवर्ण महोत्सव साजरा केला होता. ते सुमारे ५५ वर्षे या मंडळाच्या कार्यकारीणी सभासद, अध्यक्ष व ट्रस्टी अशा विविध पदावर कार्यरत होते. त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान हे प्रशंसनिय असून त्यांच्या स्मृतीसाठी हा गौरव पुरस्कार देण्याचा उपक्रम गुजराती मित्र मंडळाने त्यांचे सुपत्र केतनभाई व कौशिकभाई शाह यांच्या सहकार्याने सुरु केला. गुजराती समाजासह रोटरी, दमाणी अंधशाळा, रोटरी मुकबधीर शाळा, चेंबर ऑफ कॉमर्स,ऑईल मिल ओनर्स असोसिएशन, जैन सोशल ग्रुप आदी अनेक संस्थांच्या उत्कर्षात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
पुरस्कार विजेते राजेश शाह यांच्याविषयी-
राजेश शाह हे जयराज ग्रुप या प्रसिध्द कंपनीचे सर्वेसर्वा असून मसाला उत्पादन, बांधकाम आदी अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सद्या पुणे गुजराती केळवणी मंडळ व एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल चे अध्यक्ष असून पुना गुजराती बंधु समाजाचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. पुना मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष तर महाराष्ट्र गुजराती समाज फेडरेशनचे महासचिव पदावर कार्यरत आहेत. राजेश शाह यांना फेअर बिझनेस प्रॅक्टीसेस करीता देण्यात येणारा मानाचा जमनालाल बजाज पुरस्काराने सम्मानित करण्यात आले असून याशिवाय समाज परीवर्तन, समाजरत्न, आदर्श व्यापारी पुरस्कारानेही सम्मानित करण्यात आले आहे. पुण्यातील प्रसिध्द उपक्रम लाडू-चिवडा चे ते जनक असून या उपक्रमाने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये स्थान प्राप्त केलेले आहे.
त्यांच्या या अलौकिक कार्याचा उंच आलेख विचारात घेत, त्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार मंडळाने त्यांना जाहीर केल्याचेही सांगण्यात आले.