Type Here to Get Search Results !

शुक्रवारी राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधू-वर मोफत परिचय मेळावा; ०६ मान्यवरांना विशेष पुरस्कार


शुक्रवारी राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधू-वर मोफत परिचय मेळावा; ०६ मान्यवरांना विशेष पुरस्कार

सोलापूर : श्री ष. ब्र. तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, बृहन्मठ होटगी यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व लिंगायत महासंघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी, १५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वा. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे राज्यस्तरीय मोफत वीरशैव लिंगायत वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लिंगायत महासंघाचे प्रदेश सहसचिव सुरेश वाले यांनी दिली.

या मेळाव्याचे उद्घाटन श्री. श्री. श्री.१००८ काशी जगदगुरू डॉ . मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात बसवारूढ मठाचे सद्गुरु श्री ष.ब्र. शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते होणार आहे. सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. यावेळी राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य अ‍ॅड. मल्लिनाथ शहाबादे, प्रसिध्द हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शैलेश पाटील, पुणे येथील उद्योजक शिवराज मिठारे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, ज्येष्ठ लेखिका सुशीला वाकळे, वीरशैव लिंगायत समाज मोहोळच्या अध्यक्षा महानंदा आंडगे यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे सहसचिव सुरेश वाले यांनी म्हटले.

या कार्यक्रमास अ‍ॅड. मिलिंद थोबडे, सुधीर थोबडे, उदयशंकर पाटील, महेश थोबडे, गुरुराज माळगे, अमर पाटील, सुदीप चाकोते, राजशेखर पाटील, विजयकुमार हत्तुरे, श्रीकांत शिवपुजे, सुदर्शन बिरादार, सुरेश पाटील आदी उपस्थित राहणार आहेत, असेही वाले यांनी सांगितले. 

हा वधू-वर परिचय मेळावा मोफत असून यात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ.वसंतराव लवंगे, सुरेश पाटील, सिध्देश्वर वाकळे, सचिन शिवशक्ती, सचिन तुगावे यांनी केलं आहे.