Type Here to Get Search Results !

श्री सिद्धेश्वर इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूलमध्ये क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन



श्री सिद्धेश्वर इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूलमध्ये क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन

सोलापूर : श्री सिद्धेश्वर  इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूल मध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा क्रीडा महोत्सवाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी विविध मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रास्ताविक पर भाषणामध्ये संस्कृतीक विभाग प्रमुख सौ नीता मोरडे  यांनी आपले मनोगत व्यक्त केले मैदानी खेळ खेळल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, निर्णय क्षमता, सहानुभूती, शिस्त आणि सहकार्याची भावना निर्माण होते आणि या गुणाच्या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो, हे मोलाचे विचार सौ. पूनम वट्टे यांनी यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले .

क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन कार्यक्रमात शाळेच्या पालक-शिक्षक संघाच्या सदस्या सौ. वर्षा यादव, दिपिका कोनी, पूजा मंगरूळे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रत्नश्री तळे व शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती सृष्टी राठोड या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

शाळेतील विद्यार्थी व पालक शिक्षक संघाचे सदस्य यांच्या हस्ते क्रीडा मशाल ज्योत लावून क्रीडा मैदानाची पूजन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता चौथीची विद्यार्थिनी अनन्या कुलकर्णी या विद्यार्थिनींनी क्रीडा शपथ सर्व विद्यार्थ्यांकडून  घेतली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रत्नश्री तळे व पालक शिक्षक संघाचे सदस्य यांच्या हस्ते फुगे हवे सोडून क्रीडा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. 

क्रीडा महोत्सवाची सुरुवात मशाल घेऊन क्रीडा प्रमुख नेताजी पवार व विद्यार्थी यांनी सिद्धेश्वर मंदिर ते सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलपर्यंत प्रभात फेरी घेऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. मुख्याध्यापिका रत्नश्री तळे यांच्या हस्ते पालक-शिक्षक संघाच्या सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचं प्रास्ताविक सौ. नीता मोरडे यांनी केलं. सौ. पुनम वट्टे यांनी खेळाचे महत्व विशद केलं. शेवटी सौ. वर्षाराणी कस्तुरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रत्नश्री तळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. 

या कार्यक्रमाला क्रिडा शिक्षक नेताजी पवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शालेय शिक्षण समिती चे सदस्य माननीय येळीकर यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले अन् विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या .