सोलापूर अध्यक्षपदी आशुतोष नाटकर यांची नियुक्ती
सोलापूर : कला, सांस्कृतिक विभागातील आशुतोष नाटकर यांचं महत्त्वाचे योगदान पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशान्वये व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आशुतोष नाटकर यांची साहीत्य, कला ,सांस्कृतिक विभागाच्या सोलापूर शहर अध्यक्षपदी निवङ करण्यात आली.
याबाबतचे नियुक्ती पत्रक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साहित्य,कला व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी प्रसिध्दीस दिले. त्यांच्या निवङ प्रक्रीयेबाबत सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव केला जात असून साहित्य ,कला व सांस्कृतिक विभागात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.
पक्ष संघटन वाढीसाठी आशुतोष नाटकर यांच्या कार्याची दखल खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेऊन, आशुतोष नाटकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान त्यांच्या या निवङीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सोलापूर शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान,गटनेते तथा नगरसेवक किसन जाधव यांनी आशुतोष नाटकर यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पक्षश्रेष्ठींनी आपल्या कार्याची दखल घेतल्याबद्दल आशुतोष नाटकर यांनी पक्षश्रेष्ठी व शहर-जिल्हाध्यक्ष ,कार्याध्यक्ष,गटनेते यांचं आभार व्यत्त केले, पक्षाने विश्वासाने सोपवलेल्या संधीचे सोने करु, अशी प्रतिक्रिया आशुतोष नाटकर यांनी व्यक्त केलीय.