Type Here to Get Search Results !

पंचायत समितीत 'खिळा' ठोकून बसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बदलीसाठी बहुजन सत्यशोधक संघाचे हलगीनाद आंदोलन

पंचायत समितीत 'खिळा' ठोकून बसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बदलीसाठी बहुजन सत्यशोधक संघाचे हलगीनाद आंदोलन

सोलापूर : कुर्डूवाडी पंचायत समितीच्या विविध विभागामध्ये खिळा ठोकून बसलेल्या अधिकाऱ्यांची संख्या लक्षणिय आहे. या अधिकाऱ्यांच्या बदलीच्या मागणीसाठी बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी सकाळी ११ वा. हलगीनाद आणि दिवसभराचे धरणे आंदोलन करण्यात आले.

कुर्डूवाडी पंचायत समितीच्या विविध विभागामध्ये अनेक पदाधिकारी वर्षानुवर्षे एकाच जागेवर खिळा ठोकून बसलेल्या स्थितीत आहेत, जणू त्यांना नोकरीत बदली असते, हा संकेतही ज्ञात नाही. या अकार्यक्षम कर्मचारी-पदाधिकारी वर्गामुळं सामान्य जनांना कोणत्याही कामासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. या अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने यापूर्वीच करण्यात आली होती.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे निवेदन देऊन ही मागणी पुनश्च करण्यात आली. या मुद्द्याकडे त्यांचं पुन्हा लक्ष वेधण्यासाठी बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने मंगळवारी हलगी नाद आणि एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.

जा.क. प्राआके/आस्था३३०/११२०२३ आलेगांव, जा.क्र.उविजअ/जिपलपा/आस्था/३७/२०२३ मानेगांव, 

जा.क्र.उविजअ/जिपलपा/आ-१/१८१/२०२३ लपा कुर्डूवाडी विभाग, जा. क्र. तपसकु/जमाआ/मा.अ/प्र.क्र.११/८६६/२०२३ आणि जा.क. प्राआके/१०९/२०२३ पिंपळनेर प्राथमिक केंद्र या पदाधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या मागणी संदर्भात मंगळवारच्या हलगी नाद आंदोलन आणि धरणे आंदोलन करण्यात आले असल्याचे बहुजन सत्यशोधक संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी बहुजन सत्यशोधक संघाचे नेते गणेश देवकते, जिल्हा महासचिव सतीश वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार लांडगे, तालुकाध्यक्ष संतोष जानराव यांच्यासह विशाल जानराव आणि विजय गाजरे उपस्थित होते.