Type Here to Get Search Results !

तिन्ही ऋतूची पायपीट थांबली. .. ! गंजेवाडी-तामलवाडी बस सुरु


तिन्ही ऋतूची पायपीट थांबली ... ! गंजेवाडी-तामलवाडी बस सुरु                              

तामलवाडी : तालुक्यातील गंजेवाडी ते तामलवाडी बस सुरु करण्यात घ्यावी अशी गंजेवाडी ग्रामस्थांची केल्या अनेक दिवसांपासून मागणी होती. बस सेवेअभावी अनेक विद्यार्थ्यांना तामलवाडी ते गंगेवाडी जाण्यासाठी सायकल अथवा वर्षाच्या तिन्ही ऋतूत पायपीट करावी लागत होती. राज्य परिवहन महामंडळाने सोमवारी गंजेवाडी ते तामलवाडी दरम्यान प्रवास करणारे प्रवासी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींची पायपीट थांबवली. या दरम्यान बस सेवा सुरू झाल्याने विद्यार्थी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

गंजेवाडी येथील येथील इयत्ता ०५ ते १२ वी. वर्गात शिक्षण घेत असलेल्या ५७ विद्यार्थी- विद्यार्थिनींना शिक्षणासाठी तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयात जावे लागते. त्यातील मोजकेच विद्यार्थी सायकलवर जात होते, उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना गंजेवाडी ते तामलवाडी ही पायपीट जणू पाचवीलाच पुजलेली होती. 

या विद्यार्थ्यांना तामलवाडी येथे जाणे-येण्यासाठी गंजेवाडी गावांचे सरपंच फय्याज शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना तामलवाडी येथे शिक्षण घेण्यासाठी दररोज जी कसरत करावी लागत होती, वेळोवेळी महामंडळास पत्रव्यवहार करुन विद्यार्थ्यांची चांगली सोय केली. ती समस्या सोडवून व सर्व विद्यार्थ्यांना स्वतः मोफत पास काढून दिले.

त्याचबरोबर गावचे उपसरपंच जांबुवंत गंजे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य सुहास वडणे सर यांचे सहकार्य लाभले. त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक केलं जात आहे.