सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील होनसळ-मार्डी रस्त्यावर खळबळजनक घटना घडलीय. या रस्त्यावरील ओढ्याच्या पूलाखालील पाईपमध्ये एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सोमवारी आढळला. या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलंय.
पूलाच्या पाईपमध्ये महिलेचा आढळलेला मृतदेह सडलेल्या व कुजलेल्या अवस्थेतील असल्यानं तिची ओळख पटलेली नाही. तिची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. तिचं वय अंदाजे ४० च्या आसपास असून तिच्या हातावर स्वामी समर्थांचं चित्र असलेले व त्या खाली 'स्वामी' असं गोंदण आहे. या मिसिंगबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यास संपर्क साधावा, असं आवाहन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केलं आहे.