सोलापूर : दुचाकीवर आलेल्या चौकडीने एका तरुणाचे अपहरण करून त्याच्याकडील मोबाईलचा क्यू आर कोड स्कॅन करून जबरदस्तीने २० हजार रुपये काढून घेतले. ही घटना रविवारी सकाळी जुना कारंबा नाका ते पुन्हा रोडवर अज्ञात ठिकाणापर्यंत नेऊन त्याच्याकडे पैशाची मागणी केली त्याची पूर्तता न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चार आरोपीविरुद्ध सोमवारी, पहाटेपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सर्वेश शामसुंदर बाहेती असं त्याचं नाव असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सम्राट चौक, प्रभाकर महाराज मंदिरजवळील श्री अपार्टमेंटमधील रहिवासी सर्वेश शामसुंदर बाहेती (वय- १९ वर्षे) याची एक्सीस मोटार सायकल अडवून जबरदस्तीने गाडीवर बसवून, पुणे रोडने घेऊन गेले. त्याच्या मोबाईलमधील २० हजार रुपये त्यांचे मोबाईलचे क्युआर कोडवर स्कॅन करुन घेतले. त्याच्या वडीलांना फोन करुन पैशाची मागणी केली व नाही दिले तर ठार मारण्याची धमकीही दिली.
त्यावेळी सर्वेशच्या वडीलांनी पैसे देतो, म्हटल्यानंतर सकाळी ०८.३० वा चे सुमारास सर्वेसला सोलापूर-पुणे हायवेवरील मडके वस्ती येथील नेक्सा शोरुम येथे सोडून ते चौघे निघून गेले. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अनोळखी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सपोनि धायगुडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.