Type Here to Get Search Results !

एनसीसी शिबिरातील प्रात्यक्षिक प्रशिक्षणातून कॅडेटने वाचवले वृद्ध महिलेचे प्राण


सोलापूर : येथील द.भै.फ. एनसीसी कंपनीचा गोल्डन सीनियर अंडर ऑफिसर संतोष सुनिल पाटील,  ३८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूरचा छात्र व द.भै.फ. दयानंद महाविद्यालय आर्ट्स आणि सायन्स चा विद्यार्थी शुक्रवारी, २२ डिसेंबर रोजी, शुक्रवारच्या आठवडी परेडसाठी बेगमपूर येथील घरापासून महाविद्यालयासाठी निघाला होता. वाटेत कामती या गावी तो नाश्त्यासाठी शेजारील एका हॉटेलमध्ये थांबला. तिथेच दुपारी ११ वा. च्या दरम्यान सुमारे साठीतील वयोवृद्ध महिला हृदयविकाराच्या झटक्याच्या वेदनेने आपले भान हरवून जागीच कोसळल्या. हे दृश्य पाहून आसपासचे लोक घाबरून त्या महिलेजवळ गेले नाहीत. काही लोक अघोरीपणा करत कांदा फोडून लावा, चप्पलचा वास देण्याचा सल्ला देत होते. 

घटनेतील गांभीर्य लक्षात घेऊन वेळ न दवडता त्या वृध्देची तपासणी करून तिचा श्वासोश्वास पाहिला व तातडीने ३८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर यांनी आयोजित केलेल्या शिबिरातील प्रात्यक्षिक प्रशिक्षणामध्ये शिकलेला सीपीआर त्या मी महिलेला वेळीच दिला, त्यानंतर ती वृद्ध महिला शुद्धीवर आली. यानंतर आसपासचे लोक आनंदित झाले. त्याचाही आनंद द्विगुणित झाला. असे काम करण्याची त्याला प्रेरणा मिळाली, त्यानंतर आसपासच्या लोकांच्या मदतीने त्या महिलेला नातेवाईकांद्वारे दवाखान्यामध्ये हलवण्यात आले. त्यानंतर तो महाविद्यालयासाठी मार्गस्थ झाला.  

दभैफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर व ३८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी यांच्या मार्गदर्शनामुळे यापूर्वीही त्याने प्रजासत्ताक दिन-२०२३, २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे कर्तव्य पदावर महाराष्ट्र निर्देशालयाचे प्रतिनिधित्व करत पश्चिम विभागीय मार्चिंग समूहाचे नेतृत्व केले होते. या समूहामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व उत्तर प्रदेशचे नेतृत्व केले. व त्यासाठी त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सन्मानित करण्यात आले होते. 

त्यास ३८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम जाधव सर तसेच सुभेदार मेजर अरुण ठाकूर, ट्रेनिंग जेसीओ सुभेदार अण्णा वाघमारे व मिलिटरी इन्स्टक्टर व दयानंद महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे प्रा. कॅप्टन बी. ए. होनमाने यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनातून त्याने हे बहुमोल सामाजिक जीवनदान करण्याचे कार्य त्याच्या हातून झाले.