शाळा सुधार समिती अध्यक्षपदी तुकाराम कारभारी तर उपाध्यक्षपदी प्रमोद वाडकर

shivrajya patra



कासेगांव/संजय पवार

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बिरोबा वस्ती येथील शाळा सुधार समितीचे अध्यक्षपदी तुकाराम गणपत जाधव तर उपाध्यक्षपदी प्रमोद वाडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम कोळी यांनी बोलविलेल्या शाळा व्यवस्थापन व शाळा सुधार समितीची सर्वसाधारण सभा बिरोबा वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात नुकतीच पार पडली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष महादेव काळे व उपाध्यक्ष सौ. पोपळकर यांची ०२ वर्षाची कारकीर्द संपल्यानंतर सन २०२३-२४ मधील नूतन पदाधिकारी निवडण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. इयत्ता पहिली ते चौथी मधील माता, पालक व शिक्षक वृंद या बैठकीला उपस्थित होते. यावेळी मागील कार्याचा आढावा वाचन सचिव पुरुषोत्तम कोळी यांनी केले. 

तद्नंतर नवीन निवडीसंदर्भात कोळी यांनी सर्व उपस्थित माता-पालकांना आपल्यातून ०८ सदस्य निवडण्यास सुचविले. यावेळी सर्वानुमते तुकाराम जाधव, प्रमोद वाडकर, संजय पवार, सुधीर चौगुले, लता शिंदे, सोहेल शेख, बंडू शेख, अभिमान हेडे आणि नवनाथ क्षीरसागर यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.  मार्गदर्शनासाठी ग्रामपंचायत सदस्य नारायण जाधव, माजी सदस्य रामहरी चौगुले, मच्छिंद्र आबा चौगुले यांची निवड करण्यात आली तर अध्यक्ष पदासाठी तुकाराम जाधव व प्रमोद वाडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


संस्था सचिव पुरुषोत्तम कोळी यांनी नूतन सर्व सभासद यांचे पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. व शाळेच्या योगदानासाठी सर्वांनी मार्गदर्शन करून विद्यार्थी विकास व शाळेच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोळी यांनी तर संजय पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी सर्व स्तरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

To Top