Type Here to Get Search Results !

'मॅचकॉन' प्रदर्शनाच्या स्टॉल्स उभारणीचे भुमीपूजन



 'मॅचकॉन' प्रदर्शनाच्या स्टॉल्स उभारणीचे भुमीपूजन

सोलापूर : बिल्डर्स असोसिएशन सोलापूर शाखेच्या मॅचकॉन प्रदर्शनाच्या स्टॉल्स उभारणीचे भुमीपूजन रविवारी, १७ डिसेंबर रोजी सकाळी ज्येष्ठ सदस्य मल्लेश कावळे, अशोक गांधी यांच्या हस्ते आणि एसआरजे स्टीलचे आनंद साळुंखे, आशिष धनवाणी यांच्या उपस्थितीत जुनी मिल आवारात करण्यात आले.

सोलापूरच्या बांधकाम क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे बिल्डर्स असोसिएशन सोलापूर शाखेच्या वतीने दि. २३ डिसेंबरपासून मॅचकॉन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण देशभरातील आणि देशाच्या बाहेरील बांधकामासाठी लागणार्‍या मशिनरी तसेच प्रॉपर्टीजचा, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर आणि बांधकाम क्षेत्रातील प्रत्येक विभागाचा समावेश असणार आहे. 

जुनी मिल कंपाऊंडच्या आवारात हे मॅचकॉन प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी लागणारे स्टॉल्सची उभारणी करण्याचा प्रारंभ रविवारी करण्यात आला. हे मॅचकॉन प्रदर्शन सोलापूरसह महाराष्ट्र आणि देशातील बांधकाम क्षेत्राला मोठी भरारी देणारे ठरणार आहे, अशी माहिती बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष युवराज चुंबळकर यांनी दिली. 

या मॅचकॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातील बांधकाम क्षेत्रातील विविध मशीनरी आणि बिल्डर यांचा सहभाग होणार असल्याचे कन्वेनर दत्तात्रय मुळे यांनी सांगितले. 

या भुमीपूजन प्रसंगी बिल्डर्स असोसिएशनचे अजय अन्नलदास, राजेश देशमुख, डॉ. जी. के. देशमुख, संतोष कलकुटगी, जयसिंग साळुंखे, शशिकांत बेदरकर, अविनाश बचुवार, अमर बिराजदार, हेमंत कुलकर्णी, व्यंकटेश कोटा, सुजित पाटोळे, कवि सागर, अतुल गायकवाड आदी उपस्थित होते.