Type Here to Get Search Results !

'स्वगृही' परतण्यापूर्वीच माजी खासदार धर्मण्णा सादूल यांचे निधन



'स्वगृही' परतण्यापूर्वीच माजी खासदार धर्मण्णा सादूल यांचे निधन

सोलापूर : माजी खासदार धर्मण्णा मोंडय्या सादूल यांचे बुधवारी पावणे बारा दरम्यान निधन झाले. त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते मृत्यूसमयी ८३ वर्षांचे होते. ते स्वगृही परतणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

१९८९ साली ते पहिल्यांदा काँग्रेसकडून खासदार झाले. त्यानंतर, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्याही काळात ते खासदार होते. नरसिंह राव यांचे ते निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जायचे. काँग्रेसकडून ते दोनदा खासदार झाले. मागील काही महिण्यापासून ते आजारी होते. सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते अशी त्यांची ख्याती होती. त्यातच त्यांनी सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन काही महिन्यांपूर्वी केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीमध्ये सामील झाले. ते प्राकृतिक अस्वास्थामुळे बीआरएसमध्येही सक्रिय दिसत नव्हते.

नांदेडमध्ये सभा घेऊन ‘बीआरएस’ने महाराष्ट्रात पाऊल ठेवले. त्यांनी काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादूल यांना तेलगू भाषिकांचा आश्वासक चेहरा म्हणून पक्षात येण्याची गळ घातली. त्यानंतर सादूल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला, अन् ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला. अनेक मुस्लिम, मराठा व मागासवर्गीय लोकांसह तेलगू भाषिक त्यांच्यासोबत जोडले गेले.

पण, सोलापूर शहरातील अनेकांनी ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला अन् सादूल यांना डावलले जाऊ लागले. सहा महिने होऊनही त्यांना पक्षाने कोणतीच जबाबदारी सोपवली नाही. त्यामुळं धर्मण्णा सादूल यांच्या मनात खदखद असल्याचं बोलले जात होते. ते राजीनामा देऊन पुन्हा स्वगृही परतणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चिले जात होते. अशातच त्यांना रुग्णालयात दाखल केले, असता त्यांचं निधन झाले.