Type Here to Get Search Results !

उत्तर तहसील कार्यालयात ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र सुरू


उत्तर तहसील कार्यालयात ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र सुरू

सोलापूर :  नागरिकांना ईव्हीएम प्रणाली बाबत माहिती जाणून घेण्यासाठी तहसील कार्यालय, उत्तर सोलापूर व जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार सैपन नदाफ यांनी दिली.

उत्तर तहसिल कार्यालयाच्या आवारात, १२ डिसेंबर २०२३ पासून व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात, १८ डिसेंबर २०२३ पासून प्रात्यक्षिक केंद्र सुरू करण्यात आले आहे. दररोज सकाळी ११.०० ते ०५.३० वाजेपर्यंत नागरिकांसाठी केंद्र सुरू राहणार आहे. या केंद्रावरती नागरिकांना ईव्हीएमचे प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. तसेच नवमतदारांना मतदान करण्याबाबत त्यांच्या मनात असलेल्या शंकाचे निरसन देखील करून घेता येणार आहे. अन्य मतदारांनाही प्रत्यक्ष मतदान करून पाहता येणार आहे.

सदर प्रात्यक्षिकांचा मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार  सैपन नदाफ यांनी केले आहे.