(प्रतिकात्मक छायाचित्र)
सोलापूर : लहान-मोठ्या ३४ जनावरांना त्यांच्या चारा पाण्याची कोणतीही सोय न करता, त्यांना आखूड दुरखंडाने व दाटीवाटीने बांधून ठेवल्याच्या स्थितीत शुक्रवार पेठेतील कुरेशी गल्लीत दिसून आले. हा प्रकार शुक्रवारी पहाटे ०४ वा. पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियमानुसार चौघा कुरेशीविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या ताब्यातून ०२ लाख ५९ हजार रुपये किंमतीच्या जनावरांची मुक्तता करण्यात आलीय.
सोलापुरातील विजापूर वेस लगतच्या शुक्रवार पेठेतील कुरेशी गल्लीत, कुरेशी यांच्या जागेत, ती लहान-मोठी ३४ जनावरे आढळली. ती सर्व जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवली होती, असा पोलिसांचा अनुमान आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई जमीर मुलाणी यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ताज अहमद कुरेशी, जम्मू कुरेशी, अल्लाउद्दीन कुरेशी आणि जुबेर हाजी जिक्रिया कुरेशी (रा. महमदीया मशिद पाठीमागे, कुरेशी गल्ली-शुक्रवार पेठ, सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. सहाय्यक फौजदार काझी या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे.