सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासह आसपास मंगळवारी सायंकाळपासून रात्री झालेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र झोडपून काढले. पावसाने शिवाराला धुतले. या अवकाळी पावसाचा द्राक्ष, कांद्यासह पिकांना मोठा फटका बसला आहे. शनिवारी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे, यांनी कासेगांव शिवारात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन द्राक्ष बागा, कांदा, वडजी शिवारात केळी बागा, गुलाब शेतीची पाहणी केलीय, त्यांनी पंचनामे करून नुकसानीचा अंदाज शासनाला कळविणार असल्याचं म्हटलंय.
यंदाच्या पावसाळ्यात वरूण राजाने पाठ फिरवली, संपूर्ण पावसाळा संपला, मात्र शेतातली माती भिजून पाणी बांधापर्यंत आलं नाही. त्यामुळे नाले-ओढे कोरडेच राहिले. खरीपाची पिकं संकटात आली अन् गेली. खरीपाची बहुतांशी पिकं बळीराजाच्या हातातून गेली.
शासनाने अवकाळी पावसानंतर नुकसान पाहणीचे आदेश दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे, यांनी कासेगांव शिवारात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन द्राक्ष बागा, कांदा, वडजी शिवारात केळी बागा, गुलाब शेतीची पाहणी केलीय, त्यांनी पंचनामे करून नुकसानीचा अंदाज शासनाला कळविणार असल्याचं म्हटलंय.
कासेगांवचे तलाठी आरीफ हुडेवाले, ग्रामसेवक बाळासाहेब चौगुले, कृषि सहाय्यक धुळे, उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी चौगुले, प्रविण चौगुले, विक्रम मिटकरी, केदार ढेकळे, चंद्रकांत चव्हाण, लक्ष्मण जाधव, सुभाष येणगुरे, बापू हेडे, अजित जाधव, अण्णा माने, अजित मिटकरी, ज्ञानेश्वर कदम, राम चौगुले यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.