Type Here to Get Search Results !

बसव सृष्टीची निर्मिती ही सकल समाजासाठी गौरवाची बाब : आमदार बाबासाहेब पाटील


किनी कदू येथे बसव सृष्टीतील संविधान पार्कचे उद्घाटन

अहमदपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करताना, समाजाच्या सर्व घटकांना विचारात घेतले. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी समानता प्रस्थापित केली. किनी कदु येथे  प्रा. भीमराव पाटील यांच्या संकल्पनेतून मोघा रोडवर मोघा धरणाच्या काठी निसर्ग रम्य परिसरात बसव सृष्टीची निर्मिती केली जात आहे, ही सकल समाजासाठी गौरवाची बाब आहे, असे प्रतिपादन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.

अहमदपूर तालुक्यातील किनी कदु येथे २७ नोव्हेंबर रोजी बसव सृष्टी परिसरातील संविधान पार्कचे उद्घाटन आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नागरिक व्यंकटराव तुडमे यांनी रोपट्याला पाणी घालून व सरनाम्याचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी ते आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलत होते.

यावेळी सकल लिंगायत समाजाचे महाराष्ट्र समन्वयक विजयकुमार हत्तुरे,सोलापूरचे  उद्योगपती रेवणसिद्ध बिजर्गी,दलित मित्र नितीन शिवशरण,नांदेडचे बसवाचार्य प्रा.आनंद करने,चन्नम्मा ब्रिगेडच्या राज्याध्यक्ष शितल महाजन,बसव ब्रिगेडचे सिद्धेश्वर औरादे, धनराज गौंड, काशिनाथ इसादकर, लातूरचे बसव दर्शिका संपादक सुनील हिंगणे, चंद्रशेखर कत्ते, अॅड. सूरज विभुते, एम.के.कस्तुरे, योगेश स्वामी, निवृत्ती कांबळे, संजय पाटील, रवी बिराजदार पुण्याचे नरसिंग मुळे, राष्ट्रीय लिंगायत संघाचे संस्थापक प्रदीप वाले कोल्हापूर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोषाध्यक्ष मिलिंद साखरपे कोल्हापूर, किणीकदु चे सरपंच व्यंकटराव तुडमे, उपसरपंच सूर्यकांत कोकाटे, अहमदपूरचे राजकुमार मजगे, प्रा. गोविंद शेळके, हरिदास तम्मेवार आदि राज्यभरातून आलेल्या प्रमुख अतिथींची प्रमुख उपस्थिती होती.



या बसव सृष्टीत, महात्मा बसवेश्वरांचा ११ फुटी पुतळा, शांतिभवन गुहा, शरणभवन, वचनवन, वचन स्तंभ, अक्कमहादेवी पुतळा, शरणग्राम, वनराई, महाद्वार, पर्यटक निवास, दासोहभवन अनुभव मंटप, ग्रंथालय, म्युझियमची निर्मिती केली जाणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ४०० वृक्षांचे संवर्धन करून ऑक्सिजन झोनची निर्मिती करण्यात आली असल्याचेही आ.बाबासाहेब पाटील यांनी यावेळी म्हटले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.भीमराव पाटील, शिवदास पाटील, राजकुमार बिराजदार, रमाकांत पाटील, उमाकांत पाटील, विठ्ठलराव गुडमे, प्रा. व्यंकटेश पाटील, दत्ता गिरी, कोंडिबा हारगिले, राहुल सोनकांबळे, संजय पाटील, संग्राम पाटील, बालाजी विठ्ठल भुरे, शिवप्रसाद पाटील, मारोती हिप्पळगावे, परमेश्वर भुरे, विश्वंभर मटके, राहुल शेंबाळे, राजेश्वर भुरे, विलास भुरे, दिलीप सावरगावे, ज्ञानेश्वर तुडमे, विशाल कोकाटे, शिवाजी भुरे, भास्कर भुरे, राजेंद्र भुरे परिश्रम घेतले.