पालकमंत्री चंद्रकात पाटील ०४ डिसेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर; कासेगांवच्या पिक नुकसानीची करतील पाहणी
सोलापूर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य तथा अमरावती व सोलापूर जिल्ह्याचे
पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी, ०४ डिसेंबर रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते सकाळी ०६.०० वा. कोथरुड निवासस्थान येथून वाहनाने सोलापूरकडे प्रयाण करतील. पालकमंत्री महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषद यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर तसेच कासेगांव येथे अवकाळी पावसाने झालेल्या पिक नुकसानीची पाहणी करणार आहेत.
सकाळी १०.०० वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव, सकाळी ११.०० वा. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, जिल्हा शाखा सोलापूर आयोजित सन्मान सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.
(स्थळ : हॉटेल सिटी पार्क, चार हुतात्मा पुतळा, सोलापूर)
दुपारी१२.३० वा. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतच्या कार्यान्वयन यंत्रणांचा आढावा बैठकीस उपस्थिती (स्थळ : नियोजन भवन, सातरस्ता, सोलापूर (सभागृह क्र. ०२),
सोयीनुसार शासकीय विश्रामगृह, सोलापूरकडे प्रयाण, आगमन व राखीव.
दुपारी ०३.०० वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथून वाहनाने हत्तूर, ता. दक्षिण सोलापूरकडे प्रयाण, दुपारी ०३.३० वा. मौजे हत्तूर येथील अवेळी पावसामुळे बाधित पिक नुकसानीची पाहणी, दुपारी ०३.५० वा.हत्तुर येथून वाहनाने कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर) कडे प्रयाण, सायं. ०४.३० वा.मौजे कासेगाव येथील अवेळी पावसामुळे बाधित पिक नुकसानीची पाहणी, सायं. ०४.५० वा. मौजे कासेगाव, येथून वाहनाने सोलापूरकडे प्रयाण, सायं. ०५.३० वा. आगमन व अवेळी पाऊस, वादळीवारा, गारपीट इ. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिक नुकसानी संदर्भात आढावा बैठकीस उपस्थिती (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, सातरस्ता, सोलापूर)
रात्रौ १०.०० वा. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह, सोलापूरकडे प्रयाण, आगमन व राखीव, रात्रौ१०.१५ वा. शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने सोलापूर रेल्वे स्थानकाकडे प्रयाण, रात्रौ १०.३० वा. सोलापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. सोलापूर रेल्वे स्थानक येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने (ट्रेन क्र.१२११६) मुंबईकडे प्रयाण करतील.