Type Here to Get Search Results !

०१ लाख रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दिल्याने पोलीस उपनिरीक्षक रजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल


सोलापूर : गुन्ह्याच्या तपासातील आरोपीवर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने ०१ लाख रूपयांची लाच स्विकारण्यास संमती दिल्याचे निष्पन्न झाल्याने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपनिरीक्षक विक्रम रजपूत यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु सुरू असल्याचे एसीबी कार्यालयाने एका प्रसिद्धी पत्रकान्वये सांगितले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक विक्रम प्रतापसिंग रजपूत, तक्रारदार यांचे मित्र यांचेवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास यांच्याकडे सोपविण्यात आला होता. पीएसआय विक्रम रजपूत यांनी त्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी व तक्रारदार यांचे मित्र यांचेवर यापूर्वीही अॅट्रोसिटी व इतर गुन्हे दाखल असून त्यांचेवर सीआरपीसी कलम १०७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी स्वताःसाठी व पोनि राजन माने यांचे नावे म्हणून ०२ लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती.

तडजोडीअंती ०१ लाख रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयार दर्शविल्याचे पडताळणी कारवाईमध्ये निष्पन्न झाल्याने, पीएसआय विक्रम रजपुत यांनी अयोग्यरित्या बेकायदेशीर परितोषण स्वीकारण्याचा प्रयत्न केला असल्याने त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार- पोह शिरीषकुमार सोनवणे, पोना श्रीराम घुगे, पोना अतुल घाडगे, पोना संतोष नरोटे, पोना स्वामीराव जाधव, पोशि गजानन किणगी, चापोशि शाम सुरवसे (सर्व नेमणुक अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

..... नागरिकांना आवाहन .......
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल अथवा त्याच्यावतीने लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे दूरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८, व्हॉटस अॅप क्रमांक:- ९९३०९९७७००, संकेतस्थळ - www.acbmaharashtra.gov.in, ई मेल - www.acbwebmail@mahapolice.gov.in 
ऑनलाईन तक्रार अॅप acbmaharashtra.net 
अथवा टोल फ्री क्रमांक - १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी केले आहे.