निमित्त दिवाळीचे; उपक्रम मंथन फाऊंडेशनचा !

shivrajya patra
बुधवार पेठेतील ज्येष्ठ वारांगनांना मोफत पोषक आहार वाटप

पुणे : मंथन फाउंडेशन, चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ लोकमान्य नगर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार पेठेतील ज्येष्ठ वयोवृद्ध वारंगनासाठी शनिवारी, ०४ नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करत, मोफत पोषक आहार वाटपचं वाटप करण्यात आले.

बुधवार पेठेतील जेष्ठ वयोवृद्ध वारंगना ह्या वयात व्यवसाय करू शकत नाही, तसेच ह्या वयात होणारे शारीरिक आणि मानसिक आजार ह्यामुळे होणारे हाल लक्षात घेऊन त्यांना दिवाळीच्या निमित्ताने एक छोटासा मदतीचा हात आणि त्यांच्या आरोग्याची काळजी यासाठी मंथन फाउंडेशन, चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्ट,रोटरी क्लब ऑफ लोकमान्य नगर, पुणे, पुढाकार घेऊन २५ ज्येष्ठ वयोवृद्ध वारंगनाना पोषक पुरक रेशन किट सन्मानाने देण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मंथन फाउंडेशनच्या प्रकल्प व्यवस्थापक कविता सुरवसे  यांनी उपस्थित मान्यवरांचे, ज्येष्ठ वयोवृद्ध वारंगनाचे स्वागत करून केले. मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट ह्यांनी प्रस्तावना करीत सर्व वारांगना ताईचे कौतुक केले. दिपक निकम ह्यांनी मंथन फाउंडेशन संस्थेविषयी सविस्तर माहिती प्रस्तुत केली.

रोटरी क्लब ऑफ लोकमान्य नगर, पुणे ,अध्यक्ष मनोज आगरवाल, सेक्रेटरी ऋषिकेश बागडे , आणि चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ.संजिव आगरवाल ह्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना वारांगरांसाठी एक हात मदतीचा देत सर्वांचे कौतुक केले.

यावेळी उपस्थित मुख्य मान्यवर चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.संजिव आगरवाल, रोटरी क्लब ऑफ लोकमान्य नगर, पुणे अध्यक्ष मनोज आगरवाल, सेक्रेटरी माननीय ऋषिकेश बागडे, आय टी संचालक जितेन्द्र क्षीरसीकर, महेश पवार , मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट, दिपक निकम आदी उपस्थित होते.

मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट आणि चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. संजीव आगरवाल ह्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक कविता सुरवसे, सारिका पवार, श्रुतिका यादव, सुवर्णा पवार, बाबु शिंदे, आणि सर्व पिअर एज्युकेटरस ने मेहनत घेतली.

मंथन फाउंडेशन.
To Top