सोलापूर : खरेदीसाठी इतर प्रकारच्या तुलनेत ग्राहकांना स्थानिक बाजारपेठेत खरेदी करण्याऱ्यांचे अनेक फायदे आहेत. आपली आवडती वस्तू प्रत्यक्ष पाहता येते, त्याचे प्रात्यक्षिक घेऊन निर्णय घेता येतो. सोलापूरच्या प्रगतीसाठी सोलापूरकरांनी आपली खरेदी स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करावी, असे आवाहन सेडा चे अध्यक्ष आनंद येमूल यांनी पत्रकार परिषदेत केले.
ग्राहकाच्या इच्छेनुसार विविध मॉडेल्स एकाचवेळी प्रत्यक्ष पाहून खरेदी करणे, हे केव्हाही ऑनलाईन च्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरते. विक्री पश्चात त्वरित सेवेचीही हमी असते. अन्य माध्यमाद्वारे खरेदी ही भुरळ पाडणारी असते, त्यामध्ये आवडणारी वस्तू त्वरित न मिळता २-३ दिवसांनी येते. याशिवाय बऱ्याच वेळा वस्तू खराब किंवा आल्यावर आवडत नसल्याने ते परत बदलण्यासाठी पाठवावे लागतात.
सर्व वस्तू दुकानात ऑनलाईन दरात उपलब्ध असून एलईडी साठी दोन ते तीन वर्ष वॉरंटी आहे, तर फ्रिजसाठी १० ते २० वर्ष आहे. शून्य टक्के व्याजदरात फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स उपलब्ध. सर्व कंपन्यांचे सर्व्हिस सेंटर सोलापुरात असल्याने ग्राहकाला त्वरित सर्व्हिस मिळते.
स्थानिक दुकानदाराकडे नवीन ऑफर्स व साठ टक्केपर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहेत ऑफर्स, लकी ड्रॉ, खरेदीवर भेट वस्तू आणि सोबत प्रत्यक्ष भेटीच्या तुलनेत व्हर्च्युअल ओळख दुय्यम ठरते, असे मत सेडा चे माजी अध्यक्ष ईश्वर मालू यांनी सांगितले. अशा सर्व गोष्टींमुळे 'ऑनलाईन' च्या खरेदीच्या तुलनेत स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करावी, असे आवाहन सचिव भूषण भुतडा यांनी केले.
पत्रकार परिषेदेस उपाध्यक्ष डॉ. सुरजरतन धूत, सहसचिव हिरानंद कुकरेजा, खजिनदार सुयोग कालाणी, संचालक सर्वश्री गिरीष मुंदडा, यल्लप्पा भोसले, चंद्रकांत शहापूरे, संदेश कोठारी, बसवराज नवले, रवी पाचलगे यांच्यासह माजी अध्यक्ष खुशाल देढिया, केतन शाह उपस्थित होते.