पुणे : सामाजिक उपक्रम राबवत असताना खूप अडचणी येत असतात. त्या अडचणींना मात करून आपण कोविड काळात व त्यानंतरच्याही काळात अनेक सामाजिक व आरोग्य विषयी उपक्रम राबवित आहोत. जागतिक पातळीवर काम करणारी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड अशा संस्थेंकडून मिळणाऱ्या पुरस्काराने अजून अधिकाधिक सामाजिक कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते, अशा शब्दात पुरस्काराचे मानकरी अमोल उंबरजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुणे येथील सुजय गार्डनमध्ये शुक्रवारी, २४ नोव्हेंबर रोजी महा एनजीओ फेडरेशन पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सोलापूरचे सुपुत्र व महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांनी महा एनजीओ फेडरेशन व सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज् च्या माध्यमातून कोविड व त्यानंतरच्या काळामध्ये केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना जागतिक पातळीवर काम करणारी संस्था 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' यांच्या वतीने सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे व्हाईस प्रेसिडेंट मेहबूब सय्यद यांच्या हस्ते व महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या उपस्थितीत देण्यात आला. त्यावेळी सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना अमोल उंबरजे बोलत होते.
महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर विविध उपक्रम राबवून सामाजिक कार्य करत असतात. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे व्हाईस प्रेसिडेंट मेहबूब सय्यद म्हणाले की, अमोल उंबरजे यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. त्यामुळेच त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी अमोल उंबरजे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
माझ्या सामाजिक कार्यात विश्वास कुलकर्णी, शेखर मुंदडा, अपूर्वा कुलकर्णी, पूर्वा केसकर, अनघा परांजपे, ऋषिकेश कुलकर्णी, विजय साने, मुकुंद शिंदे, शशांक ओंबासे, रामेश्वर फुंडीपल्ले, योगेश बजाज, गणेश बाकले, अक्षय महाराज, महेश कासाट यांचे वेळोवेळी सहकार्य मिळत असते. तसेच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड उपाध्यक्ष महबूब सय्यद व त्यांच्या संपूर्ण टीमचा मी आभारी आहे या शब्दात त्यांनी या सर्वांचा ऋणी असल्याचे सांगितले.