सांगोला : भारतीय संविधान दिनानिमित्त विद्यामंदिर हायस्कूल, एकतपूर येथे संविधान दिन रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र माने, प्रमुख पाहुणे प्रगतशील बागायतदार प्रतापसिंह पाटील यांच्या शुभहस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख जितेश कोळी यांनी उपस्थित विद्यार्थी व सर्व शिक्षकांना संविधानाची शपथ दिली. या कार्यक्रमाला सर्व स्टाफ उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक घाडगे यांनी केले तर अजित महिमकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.