Type Here to Get Search Results !

संविधान दिनानिमित्त अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले उद्देश पत्रिकेचे वाचन


सोलापूर : संपूर्ण देशभरात २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने संविधान स्वीकारले. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी पुष्पहार अर्पण करून उद्देश पत्रिकेचे वाचन केले व उपस्थित अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक यांना संविधान दिनाचे महत्त्व सांगितले.


यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले, सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण मंडळाच्या सहाय्यक संचालक मनीषा फुले, सहाय्यक कामगार अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



यावेळी शाहीर रमेश खाडे व विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्व विशद करणाऱ्या करणाऱ्या अनेक गीतांचे गायन त्यांनी केले.