पुणे : भारतीय संविधान दिनानिमित्त येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आम्ही भारताचे लोक (आयोजक) तर्फे रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय संविधान जागर परिषद (वर्ष-४ थे) आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते. संविधान अभ्यासक नूर खान पठाण प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी अतिथी पाहुणे, धर्मगुरू यांचे मार्गदर्शन झाले, त्यानंतर नूर खान पठाण यांनी सखोल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संदिप थोरात व नूरखान पठाण हे आम्हाला नेहमीच विशेष सन्मान देतात. मार्गदर्शक म्हणून उल्लेख करतात, हा त्यांचा मनाचा मोठेपणा, दिलदारपणा आहे, उभयतांचं तसेच त्यांच्या टीमचे कार्य अभिनंदनीय व अनुकरणीय आहे.
या कार्यक्रमाची क्षणचित्रे, यामध्ये नूर खान पठाण, संदिप थोरात, दिंगबर कदम, रंजना कांबळे, संविधान प्रचारक अशोक तुळशीराम भवरे, धर्म-गुरु व इतर मान्यवर दिसून येत आहेत.