सोलापूर : विवाहोच्छुक तरुण-तरुणीने आपला जोडीदार निवडताना आपल्या जोडीदाराचे रूप पाहण्यापेक्षा गुण पाहून निवड केली तर जीवन सुखद आणि मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे लग्न जमवताना विवाह करू इच्छिणाऱ्यांनी परस्पराच्या रूपापेक्षा गुणाला महत्त्व देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नागेश चौगुले यांनी केले.
समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नागेश चौगुले 'मी वडार महाराष्ट्राचा', वडार ज्ञाती संस्था, श्री रूपाभवानी खाण क्रशर संघटना, सोलापूर शहर जिल्हा वडार समाज युवक संघटना, सोलापूर शहर जिल्हा महिला संघटना, सोलापूर शहर जिल्हा वडार समाज विद्यार्थी संघटना आणि अखिल वडार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पुणे यांच्यावतीने आयोजित केलेल्या सोलापुरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सर्व पोटजातींसह राज्यस्तरीय वडार समाज मोफत वधू वर पालक मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक टी. एस. चव्हाण, कोल्हापूरचे माजी महापौर बाबासाहेब पोवार, प्रा.शशिकांत जाधव, अखिल वडार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष हरीष बंडीवडार, सचिव शांताराम मनवरे, वड्डाल वधू वर सूचक मंडळाचे अॅडमिन अशोक पवार, खाण क्रशर संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण विटकर, माजी नगरसेवक विनायक विटकर, चंद्रनील सोशल फाउंडेशनचे संस्थापक सी.ए. सुशील बंदपट्टे, संजय देवकर (परळी), 'मी वडार महाराष्ट्राचा' या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर चौगुले, वडार ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष मनोहर मुधोळकर, खजिनदार आप्पाराव इटेकर, महाराष्ट्र वडार वधू वर सूचक महामंडळ सोलापूरचे अॅडमिन देविदास लिंबोळे, मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रवी शिंदे, जिल्हाध्यक्ष गौतम भांडेकर, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष सिद्धार्थ मंजेली, महिला शहराध्यक्षा ज्योती चौगुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बजरंगबली प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या मेळाव्यात तीनशे विवाहेच्छुक मुला-मुलींनी सहभाग नोंदवला.
या मेळाव्याचे प्रास्ताविक शंकर चौगुले यांनी केले. वधू वर यांचा परिचय दीपेश पिटेकर यांनी तर यादी लेखन षण्मुखानंद दाते, अंबादास चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन रवी देवकर यांनी केले तर वडार ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष मनोहर मुधोळकर यांनी आभार मानले.
या मेळाव्याच्या यशश्वितेसाठी विष्णू चौगुले,अनिल चौगुले, लहू बंदपट्टे, संजय चौगुले, सिद्धू लिंबोळे, औदुंबर धोत्रे, राजू चौगुले, अरविंद चौगुले, बालाजी विठ्ठलकर, निलेश ईटकर आदी समाजबांधवांनी परिश्रम घेतले.