सिकंदर........... !

shivrajya patra
सिकंदर शेख ठरला "महाराष्ट्र केसरी"

पुणे : जिल्ह्यातील फुलगांव इथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना गतविजेता शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख यांच्यामध्ये झाला. या रोमहर्षक लढतीत सिकंदर शेखने शिवराज राक्षेला आस्मान दाखवत ६६ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा किताब पटकावला. 

गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेखला सेमी फायनलमध्ये पराभव स्विकारावा लागला होता. मात्र यंदा त्याने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावून मागच्या वर्षी अपूर्ण राहिलेले स्वप्न या लढतीने पूर्णत्वास नेले.
To Top