कासेगाव/प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील गोकुळ शुगर च्या वतीने शनिवारी, ११ नोव्हेंबर रोजी तामलवाडी ऊस उत्पादक-पुरवठादार शेतकऱ्यांना दिपावलीच्या निमित्ताने साखर कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी २० किलो साखर २० रुपये प्रति किलो दराने वाटप केली.
पहिल्या साखर पोत्याची पूजन करून सांगवी (काटी) येथील शेतकरी ह.भ.प. बाबू खंडू गंजे यांच्या हस्ते व हगलूर येथील शेतकरी शशिकांत नवले, चंदुलाल पठाण व प्रविण शिंदे यांच्या हस्ते पूजा करून साखर वाटपास प्रारंभ करण्यात आला.
ऊसाचा प्रतिटन २, ८०० रुपये जाहीर करण्यात आल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यात आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी साखर कारखान्याचे कर्मचारी संजय पवार, शिवदास वाडकर, महारुद्र सुतार यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.