'सुगंधी दिवाळी, आनंदी दिवाळी' या संकल्पनेतून जनआधार फाऊंडेशनकडून सुगंधी उठणे वाटप

shivrajya patra
सोलापूर/प्रतिनिधी : 
दिपावलीचा आनंद द्विगुणित व्हावा,या उद्देशाने जनआधार फाऊंडेशन कडुन संस्थापक आनंद गोसकी यांच्या संकल्पनेतून 'सुगंधी दिवाळी, आनंदी दिवाळी' या उपक्रमाच्या माध्यमातून सोलापूर महापालिका प्रभाग क्र. o८ मध्ये दरवर्षीप्रमाणे जनआधार फाऊंडेशनच्या वतीने आनंद गोसकी यांच्या पुढाकाराने परीसरातील दीड हजार कुटुंबियांना ०९ ते १० नोंव्हेंबर घरोघरी जाऊन नागरीकांना सुगंधी उठणे वाटप करण्यात आले. 

सुगंधी उठणे हा अगदी अगरू उद, चंदन, कस्तुरी, केशर ईत्यादी सुगंधी पदार्थापासून केलेलं मिश्रण असते. हे अंगास लावून शरीर/चेहरा स्वच्छ होऊन कांती उजळते. नागरीकांना उठणे वापरण्याची माहिती देऊन शुभेच्छा संदेश देण्यात आले. नागरीकांनी आनंद गोसकी यांना ही आर्शिवादरूपी दिपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी जनआधार फाऊंडेशनकडुन महेश दासी, शाम कोटा, ऋषिकेश चिलवेरी, दिनेश सुरा, दिनेश श्रीकोंडा, शंकर म्हंता, हर्षित गोसकी यांनी घरोघरी जावून नागरीकांना कोणतेही समस्या असल्यास नागरीकांनी संपर्क साधण्याचं आवाहन आनंद गोसकी मित्र परिवाराकडून करण्यात आले. तसेच दिवाळी निमित्त जनआधार फाऊंडेशनच्यावतीने गरजूंना फराळ वाटपही करण्यात येते.
To Top