सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन पदाधिकारी निवडीत श्री पुरुषोत्तम बरडे यांची लोकसभा क्षेत्र प्रमुख तर विष्णू कारमपुरी (महाराज ) यांची महानगरपालिका क्षेत्र प्रमुख पदी निवड माननीय उद्धव साहेब ठाकरे पक्षप्रमुख शिवसेना यांनी निवड जाहीर केली आहे. त्या प्रित्यर्थ युवती सेना सोलापूरच्या वतीने युवती सेना शहर संघटिका सौ. रेखा अडकी यांनी शाल व पुष्पगुच्छ हार घालून सत्कार केला.
कामगार सेना कार्यालयात झालेल्या सत्कार प्रसंगी उपशहर प्रमुख सोमनाथ शिंदे , कॉलेज कक्षा प्रमुख तुषार अवताडे, युवती सेना शहर प्रमुख रेखा अडकी, नागमणी भंडारी , स्वाती शिंदे आदी उपस्थित होते.
----------------------------------------------
फोटो ओळी :
सोलापूर लोकसभा क्षेत्र प्रमुख व सोलापूर महानगरपालिका क्षेत्र प्रमुख पदी अनुक्रमे पुरुषोत्तम बरडे व विष्णू कारमपुरी यांची निवड झाल्याबद्दल युवती सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी रेखा आडकी, तुषार अवताडे, नागमणी भंडारी व स्वाती शिंदे दिसत आहेत.