यंत्रमाग कामगारांच्या बोनससंबंधी ८ नोव्हेंबरला कामगार सेनेचे निदर्शने

shivrajya patra
सोलापूर/०४ नोव्हेंबर : सोलापुरातील यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या सर्व कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस द्यावा, अन्यथा बुधवारी, ०८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने भव्य निदर्शने येईल, असा इशारा महाराष्ट्र कामगार सेनेचे भव्य निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

सोलापुरातील यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या सर्व कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस देण्यात यावी, अशी मागणी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली, परंतु यंत्रमाग कामगार धारक अद्यापही बोनस द्यायला तयार नाहीत, याउलट यंत्रणा कामगारांचा बोनसबाबत अनेक वेळा बैठका झाल्या. त्यात काही निर्णय लागला नाही. यंत्रमाग धारकांनी घेतलेले आडमुठे धोरणामुळे कामगारांना बोनसपासून वंचित राहायची परिस्थिती निर्माण झाली.

त्याचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र सेनेच्या वतीने बुधवारी, ०८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर दमाणी नगर येथे भव्य निदर्शने करण्यात येणार आहे. यावेळी यंत्रमाग कामगार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारमपुरी यांनी केले आहे.
To Top