गुरुजींच्या सांगण्यावरुन गर्भपात न केल्याच्या कारणावरून सासरी छळ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

shivrajya patra
                            (प्रतिकात्मक छायाचित्र)

सोलापूर : लग्न मोठ्या थाटा-माटात करुन न दिल्याची सल, माहेरहून १०-१२ लाख रुपये न आणल्याचा रोष, त्यातच ओळखीच्या गुरुजींच्या सांगण्यावरुन एका विवाहितेने गर्भपात न केल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी संगनमताने केलेल्या छळास कंटाळून तिने विजयपूर नाका पोलीस ठाण्याची पायरी चढली. याप्रकरणी सासू आणि अन्य तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे शहर पोलीस माहिती कक्षातून सांगण्यात आले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, होटगी रस्त्यावरील अंत्रोळीकर नगर भाग-दोनमधील रहिवासी सौ. दिपीका मधुर कुलकर्णी (वय- २६ वर्षे) हिस तिची सासू शोभा जगदिश कुलकर्णी ही वरील नमूद कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होती. सुमारे वर्षभर या छळास सहन करीत असलेल्या सौ. दिपीकाच्या मागे सासू शोभा व भाऊ श्रीकांत दत्तात्रय कुरनुरकर, संजय कुरनुरकर, स्वाती संजय कुरनुरकर (सर्व रा. विकास नगर, सोलापूर) या सर्वानी, तिच्या पोटात स्त्री जातीचं बाळ असल्याने, त्यांच्या ओळखीच्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे गर्भपात करून घेण्यासाठी तगादा लावला होता, मात्र तिने नकार दिला, त्यामुळे ते सर्वजण तिच्यावर चिडून होते.

सासूचे भाऊ श्रीकांत दत्तात्रय कुरनुरकर, संजय कुरनुरकर, स्वाती संजय कुरनुरकर (सर्व रा. विकास नगर, सोलापूर) यांनी सौ. दिपीकाला, तू आमच्या घरी पाय का ठेवलीस तुला बघून घेतो, आम्ही सिनीयर सिटीझन आहोत, आम्हाला कोणीही काही करु शकत नाही, अशा शब्दात धमकी दिली.

त्यांनी सासू शोभा कुलकर्णी हिला तिच्याविरुध्द खोटे-नाटे सांगून सौ. दिपिकाविरुध्द  पोलीसात खोटी तक्रार दिली व आमच्या मोठ्या ओळखी आहेत, म्हणून धमकी दिली. त्याच कंटाळलेल्या दीपिका आणि शनिवारी सायंकाळी विजापूर नाका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध फिर्याद दाखल केली. सपोनि नामदे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
To Top