राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेत ऋतुराज बिडकरला सुवर्णपदक

shivrajya patra
.सोलापूर : भारत सरकार क्रीडा व युवक मंत्रालय व भारतीय ऑलिम्पिक संघटना क्रीडा व युवक सेवा संचालनालय गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने वॉटर पोलो नॅशनल गेम स्पर्धा, ३० ऑक्टोबर ते ०४ नोव्हेंबर दरम्यान गोवा राज्यात पणजी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेमध्ये सोलापूरचा ऋतुराज बिडकर यांनी सुवर्णपदक प्राप्त केला.

सोलापूरचे थोरला मंगळवेढा तालीमचे प्रमुख पदाधिकारी व एसटी महामंडळात वाहतूक नियंत्रण पदावर नुकतेच सेवानिवृत्त झालेले बाळासाहेब बिडकर यांचा सुपुत्र आहे. या अगोदर ऋतुराज बिडकर यांची एशियन चॅम्पियनशिप वॉटर पोलो खेळ प्रकारात थेट भारतीय संघात निवड करण्यात आली होती, या स्पर्धा थायलंड येथे झाले. 

लहानपणापासून ऋतुराज बिडकर हा द स्पोर्ट्स पॅव्हेलियन अकॅडमीचा खेळाडू असून त्याला लहानपणापासून ॲथलेटिक्स या खेळाची आवड होती. अनेक १०० मीटर धावणे, लांब उडी या प्रकारात अनेक पदकं प्राप्त केली.  लहानपणापासून सुहास छंचुरे यांचे मार्गदर्शन मिळत गेले, स्विमिंग प्रकारात राज्य राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली. अनेक पद्धती प्राप्त केले होते, शालेय शिक्षण गांधी नाथा रंगजी विद्यालय येथे झाले. पुढील शिक्षण संगमेश्वर महाविद्यालयात पूर्ण केले.

त्याच्या या यशाबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, भारतीय ऑलम्पिक संघटनेचे झुबेन अमेरिया, जलतरण प्रशिक्षक श्रीकांत शेटे,  प्रा. आनंद चव्हाण, प्रा. संतोष खेंडे, ज्येष्ठ क्रीडा संघटक प्रकाश भुतडा, राजेंद्र माने, सुहास छंचुरे, अजित पाटील, शिवानंद सुतार यांनी हार्दिक अभिनंदन केले.
To Top