सोलापूर : सोलापूर शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या खून प्रकरणात फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या ६ तासात जेरबंद केलंय. ज्योतिबा तानाजी केते (वय-३६ वर्षे) असं आरोपीचं नांव असून त्यास न्यायालयासमोर उभं केलं असता, न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
शुक्रवारी, ०३ नोव्हेंबर रोजी फौजदार चावडी पोलिस ठाणे हद्दीत इंदिरा गांधी स्टेडियमसमोर सावजी हॉटेलच्या बाजूला हमरस्त्यावर अज्ञाताने, अज्ञात कारणावरून अज्ञात हत्याराने अज्ञात एका तरुणाची हत्या केली. या हत्त्येच्या अनुषंगाने फौजदार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत, केलेल्या चौकशीत, मृताचे नांव राजू कोंडीबा बंडगर (रा.शनि मंदीर, रेल्वे कॉलनी, सोलापूर) असे असल्याचे निष्पन्न झाले.
मृताची ओळख पटल्यावर त्याची हत्त्या करणारा खूनी आणि हत्त्येमागचं कारण आणि त्पासाठी वापरलेले हत्यार याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली, फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक आरोपीचा शोध घेत असताना, या गुन्ह्यातील संशयित आरोपी सिद्धेश्वर मंदीर परिसरात लपून बसल्याची गोपनिय माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संशयिताच्या मुसक्या आवळत अवघ्या सहा तासात गजाआड केलं.
ज्योतिबा तानाजी केते (वय-३६ वर्षे, रा.प्लाॕट नं.सी ४४१ जाई जुई नगर, जुळे सोलापूर) असं संशयित आरोपीचं नांव आहे. गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्यास अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपी हा मनोविकृत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. सहाय्यक पोलिस आयुक्त (विभाग-१) डॉ.संतोष गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना या गुन्ह्याच्या तपासासंदर्भातील माहिती दिलीय.
ही कामगिरी पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांच्या आदेशाखाली पोलिस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वनाथ सिद, पोलिस निरीक्षक विकास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच फौजदार चावडी पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकातील कर्मचारी अजय पाडवी, प्रविण चुंगे, दत्ता कोळवले, नितिन जाधव, विनोद व्हटकर, सुधाकर माने, नितिन मोरे, सचिनकुमार लवटे, पंकज घाडगे, कृष्णांत बडुरे, अजय चव्हाण, अमोल खरटमल, विनोद पुजारी, शशिकांत दराडे, नागनाथ घुळवे यांनी या कारवाईसाठी परिश्रम घेतले.