सोलापूर : शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार प्रशांत यलप्पा शिवशरण (वय- २७ वर्षे, रा. रुपाभवानी मंदिरजवळ, आडवा नळ, भवानी पेठ, सोलापूर) हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करुन जबरी चोरी, दुचाकी चोरी, घरफोडी, गैरकायद्याची मंडळी जमविणे, दुखापत करणे, खंडणी मागणे, तडीपार आदेशाचा भंग करणे आणि धमकी देणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने, अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्याविरुध्द अशा प्रकारे गंभीर स्वरुपाचे १६ गुन्हे सोलापुर शहरात दाखल आहेत.
त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. प्रशांत शिवशरण याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असून, त्याच्याविरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत, असेही पोलिसांचे मत आहे.
त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी प्रशांत शिवशरण यास सन २०२२ मध्ये क.५६(१) (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार प्रतिबंधक (तडीपार) कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल, अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी, ०३ नोव्हेंबर रोजी त्याच्याविरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्यास ०४ नोव्हेंबर २०२३ रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, त्यास येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले.
ही कारवाई, पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-०१ ) डॉ. संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दोरगे, वपोनि राजेंद्र करणकोट (जोडभावी पेठ पोलीस ठाणे), पोउपनि/विशेंद्रसिंग बायस व एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ/८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी पार पाडली.
पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी कार्यभार स्विकारल्यापासून एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची १७ वी व या वर्षातील १३ वी कारवाई आहे.