Type Here to Get Search Results !

दीड वर्षांपूर्वीचा वाद; कुटुंबातील तिघांवर खूनी हल्ला

सोलापूर : पूर्वी झालेल्या भांडणाचा रोष मनात धरून समीर मोदीन शेख याच्यासह चौघांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात तरबेज निसार अहमद शेख (वय- ४२ वर्षे) याच्यासह तिघे जखमी झाले. ही घटना सलगर वस्तीतील अण्णासाहेब पाटील प्रशालेच्या कंपाउंड लगत असलेल्या कट्ट्यावर रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्तालयाच्या माहिती कक्षातून सांगण्यात आले.

थोरली इरण्णा वस्तीतील तरबेज शेख आणि समीर मोदीन शेख यांच्यात सुमारे दीड वर्षांपूर्वी वाद झाला होता. त्याचा रोष मनात धरून समीर शेख व त्याच्या तीन साथीदारांनी तलवार, लोखंडी पाती असलेले फावडे आणि लोखंडी रॉड आदी हत्यारांच्या साहाय्याने तरबेज त्याचा भाऊ आणि आई यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात तिघे जखमी झाले.

याप्रकरणी जखमी तरबेज शेख यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सलगर वस्ती पोलिसांनी समीर शेख, फिरोज शेख, मोदीन शेख आणि वसीम शेख (सर्व रा. थोरली इरण्णा वस्ती, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सपोनि शेख या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.