पूजा-दिवाळी-छठसाठी मध्ये रेल्वे चालवणार विशेष वनवे ट्रिप ट्रेन

shivrajya patra
सोलापूर : मध्य रेल्वे पुणे आणि दानापूर सोलापूर -छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान पूजा-दिवाळी-छठ साठी विशेष वनवे ट्रिप ट्रेन चालवणार आहे.
 
मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पुणे - दानापूर आणि सोलपुर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अतिरिक्त पूजा/दिवाळी/छठ सण विशेष वनवे ट्रिप  गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

 तपशील खालीलप्रमाणे आहे:
१) पुणे-दानापूर विशेष एक फेरी ( 20 डब्बे)
ट्रेन नं. 01057 पुणे - दानापूर विशेष  दि. 15.11.2023 (बुधवार ) रोजी पुणे सकाळी संध्याकाळी 07.55 वाजता सुटेल आणि दानापूर येथे  तिसऱ्या दिवशी 04.30 वाजता पोहोचेल.
थांबा: दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जं. बक्सर आणि आरा.
संरचना: 20 डब्बे - एक तृतीय वातानुकूलित, 1- द्वितीय वातानुकुलीत,  6 सामान्य , स्लिपर -10,  2 गार्ड्स ब्रेक व्हॅन.

2) सोलापूर -  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष-एकमार्गी फेरी (17 डब्बे)
ट्रेन नं. 01059  सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष दि. 15.11.2023 ( बुधवार) रोजी सोलापूर येथून  दुपारी 12.50 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस   येथे  त्याच दिवशी रात्री 09.30 वाजता पोहोचेल.
थांबा: कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, दादर. 
संरचना: एक सामान्य द्वितीय श्रेणी, 12 - स्लीपर, दोन तृतीय श्रेणी वातानुकुलीत , 2 गार्ड्स ब्रेक व्हॅन.
आरक्षण : सर्व आरक्षण केंद्रातील काउंटरवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर गाड्यांचे आरक्षण आधीच सुरू आहे.
 
तपशीलवार वेळा आणि थांब्याच्या माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस  (NTES) ॲप डाउनलोड करा, असंही मध्य रेल्वेने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
                                                    
To Top