Type Here to Get Search Results !

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर शहर वाहतूक मार्गात बदल

सोलापूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकवारी दिनांक १८ ते दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत भरणार असून सदर यात्रा कालावधीत पंढरपूर शहर बाह्यमार्गावरून जाणाऱ्या जड वाहतुकीमुळे पंढरपूर शहरात दाखल होणाऱ्या भाविकांच्या जिवितेला धोका व वाहतुक नियमनास अडथळा होऊ नये, या करीता उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांनी त्यांचेकडील  ३० ऑक्टोबर २०२३ अन्वये पंढरपूर शहराकडे येणारी जड अवजड वाहतुक संबंधीत पोलीस ठाणे हद्दीतील योग्य त्या पॉईन्ट वरून बंद करून ती पर्यायी मार्गावरून वाहतुक वळविणेबाबत कळविले आहे.

त्या अनुषंगाने शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या कलम 33 (1) (ब) च्या अन्वये मला प्राप्त असलेल्या शक्तीच्या अधारे दिनांक 18 नोव्हेंबर 2023 रोजी 00.01 ते दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी 24:00 वा. पर्यंत पंढरपूर शहर बाहय मार्गावरून जाणारी जड वाहतुक अन्य पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याने खालील नमुद पॉईन्टवरून जड अवजड वाहतुक बंद (शासकीय अन्नधान्य, डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडर, उस वाहतुक करणारी वाहने वगळुन ) करण्यात येत असल्याचे आदेश देत आहे.

पोलिस ठाणे – मोहोळ –  जड वाहतुक प्रवेश बंद ठिाकाण- शिवाजी चौक- पर्यायी मार्ग –मोहोळ, कामती-  मंगळवेढा-सांगोला.   , किंवा मोहोळ-शेटफळ- टेंभुर्णी- वेळापूर- सांगोला.
जड वाहतुक प्रवेश बंद ठिाकाण -शेटफळ चौक – पर्यायी मार्ग -  शेटफळ- टेंभूर्णी- अकलुज-वेळापूर –महुद-सांगोला.  किंवा  शेटफळ- माहोळ- कामती-मंगळवेढा – सांगोला .
जड वाहतुक प्रवेश बंद ठिकाण - टाकळी सिकंदर – पर्यायी मार्ग -टाकळी सिकंद –कुरूल –माहोळ-शेटफळ- टेंभुर्णी . किंवा टाकळी सिकंदर-कुरूल कामती-मंगळवेढा- सांगोला- महुद- वेळापूर.

पोलीस ठाणे - कामती –जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण – कुरूल चौक –पर्यायी मार्ग- करूल- कामती मंगळवेढा- सांगोला- महुद- वेळपूर- अकलुज.  किंवा  करूल- मोहोळ –शेटफळ- टेंभूर्णी –अकलुज-  वेळापूर.

पोलीस ठाणे – टेंभूर्णी - जड वाहतुक प्रवेश बंद ठिाकाण –वेणेगाव फाटा - पर्यायी मार्ग–वेणेगाव- टेंभुर्णी- अकलुज- वेळापूर- महुद -सांगोला . किंवा वेणेगाव- शेटफळ -मोहोळ –कामती- मंगळवेढा -सांगोला.
पोलीस ठाणे- वेळापूर - जड वाहतुक प्रवेश बंद ठिाकाण- श्री ज्ञानेश्वर चौक वेळापूर –पर्यायी मार्ग – वेळापूर- साळमुख –महुद- सांगोला- मंगळवेढा –कामती.  किंवा  वेळापूर- टेंभूर्णी -शेटफळ -मोहळ –कामती.
साळमुख चौक –साळमुख महूद सांगोला मंगळवेढा कामती किंवा साळमुख –वेळापूर- टेंभूर्णी –शेटफळ –मोहोळ-कामती.
पोलीस ठाणे-सांगोला - जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण- महुद चौक –पर्यायी मार्ग – महुद -सांगोला मंगळवेढा- कामती- मोहोळ. किंवा  महुद –वेळापूर- टेंभुर्णी –शेटफळ- मोहोळ.
जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण- मंळवेढा कोल्हापूर बायपास पुलाखाली –पर्यायी मार्ग - सांगोला -मंगळवेढा -कामती -मोहोळ -शेटफळ- टेंभूर्णी  किंवा सांगोला –महूद- वेळापूर- टेंभूर्णी –शेटफळ -मोहोळ.
पोलीस ठाणे –मंगळवेढा – जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण -मंगळवेढा नाका बायपास –पर्यायी मार्ग -मंगळवेढा – कामती- मोहोळ- शेटफळ- टेंभूर्णी-  किंवा  मंगळवेढा –सांगोला- महुद- वेळापूर- टेंभूर्णी .
पोलीस ठाणे –करकंब - जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण-भोसे पाटी- पर्यायी मार्ग – करकंब –वेणेगाव-टेंभूर्णी- अकलुज –वेळापूर- महुद –सांगोला. किंवा करकंब –वेणेगाव- शेटफळ- मोहोळ- कामती – मंगळवेढा – सांगोला.

तरी सदर चा आदेश हा दि. 18 नोव्हेंबर 2023 रोजी 00.01 ते  दि.27 नोव्हेंबर 2023 रोजी 00.24  वा. पर्यंत अमलात राहिल कार्तिकीवारी कालावध संपताच पंढरपूर जड वाहतुक नियमन दि. 7 एप्रिल 2019 च आदेश पुर्ववत अमंलात राहिल, असे आदेशात नमूद केलेले आहे.
..................
कार्तिकीवारी कालावधीत पंढरपूर शहर व परिसरातील वाहतुक मार्गात बदल

उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपुर विभाग, पंढरपुर यांनी दिनांक 30 ऑक्टोबर 2023 अन्वये श्री क्षेत्र पंढरपुर येथे कार्तिक शुध्द पंचमी दिनांक 18 नोव्हेंबर 2023 ते कार्तिक शुद्ध पोर्णिमा दि. 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीत कार्तिकी यात्रा भरणार आहे. या  यात्रा कालावधीत पंढरपुर शहर व पंढरपुर परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होवु नये म्हणुन शहरातील महत्वाचे रस्त्यावर पंढरपूर शहरात प्रवेश करणा-या वाहनांबाबत, शहरातून बाहेर जाणा-या वाहतुकीबाबत, पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतुकीबाबत, पार्किंग व्यवस्था, एकेरी मार्ग याबाबत नियोजन करणे गरजेचे असल्याने
 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या कलम 33 (1) (ब) अन्वये दि. 21 नोव्हेंबर 2023 रोजी 00.01 ते दि. 27 नोव्हेंबर 2023 रोजी 24.00 वाजे पर्यत पंढरपुर शहर व पंढरपुर परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होवु नये म्हणुन पंढरपूर शहरात प्रवेश करणा-या वाहनांबाबत, शहरातून बाहेर जाणा-या वाहतुकीबाबत, पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतुकीबाबत, पार्किंग व्यवस्था, एकेरी वाहतुक अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक ग्रामीण शिरीष सरदेशपांडे यांनी खालील प्रमाणे आदेश दिले आहेत.
(अ) पंढरपूर शहरात प्रवेश करणा-या वाहनांबाबत :-
अहमदनगर, बार्शी, सोलापूर, मोहोळ कडून येणारी सर्व प्रकारची वाहने करकंब कॉस रोड (अहिल्यादेवी चौक)
तीन रस्ता मार्गे विसावा येथे पार्किंग करतील, तसेच 65 एकर येथे फक्त दिंडी व पालखीचे वाहने पार्किंग करतील.  पुणे, सातारा, वाखरीमार्गे येणारी वाहने वेअर हाउस व इसबावी विसावा येथील मैदानात पार्किंग करतील.
कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाउस मध्ये पार्कींग करतील.
कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी मार्गे वेअर हाउस मध्ये पार्किंग करतील.
विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने कासेगाव फाटा, टाकळी मार्गे वेअर हाउस मध्ये पार्किग करतील व बिडारी बंगला व यमाई तुकाई मंदिर मैदान येथे पार्किंग करतील.
(ब) शहरातून बाहेर जाणा-या वाहतूकीबाबत :-
टेंभूर्णी, अहमदनगर, सोलापूर, लातूर कडे जाणा-या सर्व गाड्या सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड, करकंब चौक या मार्गाने जातील.
पुणे, सातारा कडे जाणा-या सर्व गाड्या सरगम चौक, कॉलेज क्रॉस रोड वाखरी मार्गे जातील.
विजापूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढाकडे जाणा-या सर्व गाडया या सावरकर चौक, नवीन कराड नाका, टाकळी बायपास मार्गे जातील.
क) पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतूकीबाबत:
दि. 21 नोव्हेंबर 2023 ते 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनास बंद करण्यात येत आहे. - महाव्दार चौक ते शिवाजी चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे.  सावरकर चौक ते शिवाजी चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
बार्शी, सोलापूर या मार्गावरून तीन रस्ता मार्गे येणारी हलकी वाहने फक्त अंबाबाई पंटागणात उतरतील. ५) नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणा-या एस. टी. बसेस यांना जुना दगडीपूल, तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येत आहे.
मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक या मार्गाने शहरात सर्व प्रकारचे वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे.
अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पंटागण ते अर्बन बँक, सावरकर चौक ते अर्बन बँक, लहुजी वस्ताद चौक ते काळा मारुती चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनास बंद करण्यात येत आहे.
(इ) पार्किंग व्यवस्था:-
अहमदनगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी सर्व प्रकारची वाहने करकंब क्रॉस रोड (अहिल्या चौक), , तीन रस्ता मार्गे विसावा येथे पार्किंग करतील. तसेच नगरपालिकेच्या वाहनतळावर पार्किंग करतील.
पुणे, सातारा, वाखरी मार्गे येणारी वाहने इसबावी विसावा येथे पार्कींग करतील,
कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने ही वेअर हाउस मध्ये पार्कींग करतील.
कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने ही कासेगांव फाटा, टाकळी मार्गे वेअर हाऊस मध्ये पार्किंग करतील.
विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने ही कासेगाव फाटा, टाकळी मार्गे वेअर हाऊस मध्ये पार्किंग करतील. व बिडारी बंगला व यमाई तुकाई मंदिर मैदान येथे पार्किंग करतील.
यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहरात येणारी हलकी वाहने अंबाबाई पटांगण येथे व तसेच संबंधीत मठामध्ये पार्क होतील.
शहरातील अंतर्गत रोडवर कोणत्याही ठिकाणी गाडया पार्किंग होणार नाहीत.
(इ) एकेरी मार्ग :
कॉलेज क्रॉस रोड ते सरगम चौक ते सावरकर चौक ते नवीन कराड नाका या मार्गावर एकेरी वाहतुक राहील.
(ई) शहरा बाहेरून जाणा-या वाहतुकीबाबत :-
पंढरपूर शहर बाहय मार्गावरून जाणा-या जड-अवजड वाहतुकीच्या वाहतुक नियमनाबाबत स्वतंत्र जाहिरनामा निर्गमित करण्यात येत आहे.
तरी सदरचे  आदेश दिनांक 21 नोव्हेंबर 2023  रोजी 00.01 ते 27 नोव्हेंबर 2023 रोजी 24 .00 वाजता पर्यंत अंमलात राहतील असेही आदेशात नमूद केलेले आहे.