सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्व पशुपालक , शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांना कळविण्यात येते की , पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने सधन कुक्कुट विकास गट नेहरू नगर , सोलापूर येथे १५ दिवसांचे कुक्कुट पालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे. २८ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत प्रशिक्षण कालावधी आहे. तरी प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्यांचे अर्ज, २० ते २४ नोव्हेंबरपर्यंत स्विकारले जातील. तरी इच्छुकानी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता किमान ०७ वी पास असणे अपेक्षित आहे. तसेच सदर प्रशिक्षण सुशिक्षित बेरोजगारांना सुवर्णसंधी आहे. सदर प्रशिक्षणासाठी प्रवेश फी सर्व प्रवर्गासाठी १०० रूपये आकारण्यात येईल, सोबत शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड , फोटो जोडणे आवश्यक आहे, असे आवाहन डॉ. एन.एल. नरळे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांनी केले आहे.
प्रशिक्षणासाठी संपर्क डॉ. एस. एम. बोधनकर, पशुधन विकास अधिकारी, सधन कुक्कुट विकास गट , नेहरु नगर, बी.पी.एङ कॉलेज जवळ , सोलापूर .