Type Here to Get Search Results !

आझाद सोशल फाउंडेशनच्या वतीने ११ समाज रत्नांचा गौरव

सोलापूर : स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीदिनी येथील आझाद सोशल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक, शिक्षण, क्रिडा आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या ११ मान्यवरांना सुप्रसिध्द अभिनेते रजा मुराद यांच्या हस्ते यंदाचे सोलापूर समाज रत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

शनिवारी, ११ नोव्हेंबर रोजी येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित करण्यात पुरस्कार वितरण सोहळ्यात या पुरस्कारांचं वितरण करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर आरीफ शेख, माजी महापौर मनोहर सपाटे, उद्योगपती फारूख शाब्दी, आसिफ इक्बाल (सर) यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात अब्दुल रशीद बागबान (कॅप्टन), प्रो. आय.आय. मुजावर यांच्यासह ११ रत्नांना, सोलापूर समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

आझाद सोशल फाऊंडेशनने सोलापूरच्या सामाजिक कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सोलापुरातील क्रिडा क्षेत्रात प्रसिद्ध व्हॉलीबॉल खेळाडू व कर्णधार असा अब्दुल रशीद बागबान यांचा तर शैक्षणिक पटलावर प्रो. आय. आय. मुजावर यांचा लौकिक आहे. त्यांच्यासह समाजातील सर्व समाजरत्नांना प्रमुख अतिथी सिने अभिनेते रझा मुराद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी आझाद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष जावीद अहमद खैरदी, उपाध्यक्ष रियाज सय्यद आणि सचिव युनूस सय्यद यांच्यासह अन्य पदाधिकारी सभासद आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.