सोलापूर : दीपावली पाडव्यानिमित्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मंगळवारी, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून तसेच बळीराजा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जिजाऊ वंदना म्हणण्यात आली. 'इडा पिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे', अशा घोषणा देऊन बळीराजाचे पूजन करण्यात आले.
बळीराजाचे पूजनानंतर दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री सदाशिव पवार, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शिवश्री प्रकाश ननवरे, जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवमती उज्वला साळुंखे, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष शिवमती निर्मला शेळवणे, मनिषा नलावडे, वर्षाराणी पवार, रूपाली ननवरे, सिंधू व्यवहारे, रंजना सुरवसे, अंजली सुरवसे, श्रावणी सुरवसे, मानसी ननवरे, वैशाली शिरसागर, गीता पवार, प्रज्ञा डोंगरे, साक्षी शहाणे, देविका जाधव, गोवर्धन गुंड, कल्याण गव्हाणे, स्वप्निल जाधव, सौरभ आकाशे, गजानन साळुंखे, भारत सुरवसे, तुषार गायकवाड, रमेश जाधव, प्रकाश जाधव, कुमार शिरसागर, सोमनाथ चव्हाण, सचिन चव्हाण, राजू व्यवहारे, प्रकाश डोंगरे, ज्योतिर्लिंग करांडे, परशुराम पवार, सोमनाथ शिंदे ,अमोल डोंगरे, पृथ्वीराज चव्हाण, प्रथमेश ननवरे, विअंश पवार आदी उपस्थित होते.