सोलापूर : अज्ञात चोरट्याने बेडरुममधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्यात ठेवलेली ०२ लाख १३ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना जुन्या विडी घरकुलातील सोनिया नगरात मंगळवारी सकाळपूर्वी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे माहिती कक्षातून सांगण्यात आले.
सोनिया नगरातील गोपीचंद राम चव्हाण यांचे घर बंद असताना घरातील मुख्य लाकडी दरवाजा आणि बेडरूम मधील दरवाजाचे कडी कोयंडा अज्ञात औजाराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूम मधील कपाटाचे लॉक तोडून कपाटात ठेवलेली ०२ लाख १३ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान घडला.
हा प्रकार दिसून आल्यावर गोपीचंद चव्हाण यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक रजपूत या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.