Type Here to Get Search Results !

वाईन्स दुकानाचा पत्रा उचकटून ०१.८८ लाख रुपयांची चोरी


सोलापूर : अज्ञात चोरट्यानं दुकानाच्या गोडाऊनचा पत्रा उचकटून दुकानातील काउंटरजवळ ठेवलेल्या पत्र्याच्या डब्यातील ०१.८८ लाख रुपये चोरून नेले. ही घटना साखर पेठेत विणकर बागेसमोर मंगळवारी सकाळपूर्वी घडली. मंगळवारी सकाळी दुकान उघडल्यावर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले.

साखर पेठेतील विणकर बागेसमोर असलेल्या गडगी वाईन्स या दारू दुकानात, सोमवारी रात्री दुकान बंद झाल्यानंतर, अज्ञात चोरट्याने गोडाऊनचा पत्र उचकटून दुकानात प्रवेश केला. चोरट्याने काउंटर जवळ ठेवलेल्या पत्र्याच्या डब्यातील ०१.८८ लाख रुपये चोरून नेले. याप्रकरणी नितीन अंबाजी गडगी (रा. भद्रावती पेठ, सोलापूर) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक राठोड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.