न्याय पंचायत बसविण्याच्या निमित्ताने अपहरण जबर मारहाण केल्याने ०६ जणांविरुध्द गुन्हा दाखल

shivrajya patra
सोलापूर : शेताच्या वाटणीची न्याय पंचायत करण्याच्या बहाण्याने अॅपे रिक्षात बळजबरीने नेऊन तरुणास मारहाण करण्यात आली. हा प्रकार हुल्लोळी शिवारात रविवारी, ०५ रोजी घडली. महेश अप्पाराव कळमंडे (वय - ३७ वर्षे) असं अपहरण करुन मारहाण करण्यात आलेल्या तरूणाचं नांव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पंडित यशवंत कळमंडे यांच्यासह ०६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, महेश कळमंडे (रा - ७३, वसुंधरा नगर, मजरेवाडी) रविवारी सकाळी, एमआयडीसीतील अविनाश नगरातून किराणा साहित्य घेऊन, त्यांच्या मोटार सायकलीस किराणा साहित्य बांधत होते. त्यावेळी पिवळ्या रंगाच्या ॲपे रिक्षातून आलेल्या पंडित कळमंडे व त्याच्याबरोबर अन्य जणांनी रिक्षातून खाली उतरून त्यास 'आपल्याला शेताला जाऊन चार लोकात बसून शेतीचा वाटणीची न्याय पंचायत करायची आहे, तु आमच्या सोबत चल' असं म्हणनू महेश याचे हात-पाय पकडून बळजबरीने रिक्षात टाकले.

त्यास हुल्लोळी शिवारातील शेतात घेऊन गेल्यावर तेथील लोखडी पलंगावर बसवले. तेथे गौरीशंकर कळमंडे याने त्यास, शेताची वाटणी कर, नाहीतर तुला आम्ही सोडणार नाही, असे म्हटले. त्यावेळी संतप्त पार्वती गौरीशंकर कळमंडे आणि मिनाक्षी अविनाश माने यांनी महेशला मारहाण केली, दरम्यान पंडीत यशंवत कळमंडे २) गौरीशंकर यशंवत कळमंडे, दयानंद गौरीशंकर कळमंडे, चिदांनद गौरीशंकर कळमंडे यांनी लाकडाने मारहाण केली. पंडीत आणि चिदानंदने लाकडाने मारल्याने त्यास जबर दुखापत झाली.

याप्रकरणी जखमी महेश कळमंडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पंडीत कळमंडे, गौरीशंकर कळमंडे, दयानंद कळमंडे, चिदांनद कळमंडे, पार्वती कळमंडे आणि मिनाक्षी माने (सर्व रा- कलावती नगर, एमआयडीसी, सोलापूर) या ०६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सपोनि कुकडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
To Top