सोलापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल बालाघाट रोड, गोंदिया येथे ०१ ते ०४ नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या आंतरशालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत अल्फिजा शफिक शेख हिने १४ वर्षाखालील मुलींच्या गटात ईपी या खेळ प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले.
या यशाबद्दल शाळेचे संस्थापक-अध्यक्ष ए. डी. जोशी, सचिव अमोल जोशी, श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी, मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी, अचला राचर्ला, ममता बसवंती यांनी अभिनंदन केले.