सोलापूर : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार बुधवारी, ०८ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध कार्यालयासमोर राज्य शासनाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त अध्यक्ष विजय भांगे यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देऊन शासनाला सादर करण्यात आले.
यामध्ये जिल्हा कोषागार कार्यालय विभाग,.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील अनेक खाते असलेले विभाग, आयटीआय विभाग मंद्रूप विभाग, मलेरिया विभाग, राज्य कामगार विमा रुग्णालय, व्ही एम मेडिकल कॉलेज विभाग, हत्तीरोग विभाग, अशा अनेक विविध खातेनिहाय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेशी संलग्नित असलेल्या अनेक कर्मचारी संघटनांनी आपापल्या कार्यालयासमोर शासनाच्या निषेधार्थ सामूहिकरित्या आंदोलन केले.
सरकारी कर्मचारी यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला "माझे कुटुंब माझी पेन्शन" या अनुषंगाने एमपीएस धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, तसेच इतर अनेक प्रलंबित महत्त्वाच्या मागणीचे सामूहिकरीत्या निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना देण्यात आले.
यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नवनियुक्त जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे, कार्याध्यक्ष सी.एस.स्वामी, कोषाध्यक्ष हुसेन बाशा मुजावर, संघटक आशुतोष नाटकर, सहसचिव सटवाजी होटकर, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपाध्यक्ष भीमराव लोखंडे, सल्लागार रघुनाथ बनसोडे, सहसचिव ए. आर. रंगरेज, पी. डी. वाघमारे, समीर हुंडेवाले, एम. वाय. पटेल, उपाध्यक्ष सुनील बोलाबत्तीन, उपाध्यक्ष फिरोज मुलाणी आदी नूतन पदाधिकारी उपस्थित होते.