Type Here to Get Search Results !

घडलेली घटना अत्यंत चुकीची ! ... विषय नक्कीच चर्चेतून सुटला असता : अध्यक्ष अशोक मुळीक


सोलापूर : नवीपेठ व्यापारी असोसिएशनला कोणतेही निवेदन न देता वा असोसिएशनशी चर्चा न करता संबंधित संघटनेने सोमवारी जी घटना घडली, ती अत्यंत चुकीची आहे. आज दुर्दैवाने जी घटना घडली ती घटना घडायला नको होती. ही घटना झाल्यामुळे बाजारपेठेच्या शांतता व सुवव्यथेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजचा विषय हा नक्कीच चर्चेतून सुटला असता, असं नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक यांनी म्हटले.

दुकानावरील पाट्या मराठीत असावी, तसे न्यायालयाचा ही निर्णय आहे. अशातच मराठी फलकाचा आगृही असलेल्या पक्ष-संघटनेच्या  समर्थकांच्या नव्या पेठेतील एका दुकानावरील इंग्रजी फलक निशाण्यावर आला. त्या घटनेवर अध्यक्ष मुळीक यांनी त्यांचं मत व्यक्त केलं.

सोलापुरातील मुख्य व प्रमुख बाजारपेठ म्हणून नवीपेठ चा लौकिक आहे. नवीपेठ व्यापारी असोसिएशन नेहमी कायदा व सुव्यवस्थेला धरून कार्यरत आहे. 'अशा' कुठल्याही घटना घडल्या, तर यामध्ये नवीपेठ व्यापारी असोसिएशन म्हणून प्रामुख्याने लक्ष दिले जाते.

कोणतेही सरकारी व प्रशासकीय आदेश आल्यावर प्रथम आम्ही सर्व व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो, त्यात काही दुमत नाही. नवीपेठ मधील जवळ-जवळ सर्व व्यापाऱ्यांचे बोर्ड हे मराठीतच आहेत, परंतु जे बोटावर मोजण्या इतपत व्यापार-व्यवसायांचे फलक मराठीत करणे राहिले होते, ते त्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन मराठीत करून घेता आले असते, अशी खंतही नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक यांनी व्यक्त केली आहे.