सोलापूर : होटगी रोड, किनारा हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या दिशा-विहार प्रतिष्ठान (बाग) येथे बालाजी अमाईन्स च्या वतीने मल्टि अॅक्टिव्हीरी प्ले सिस्टम बसवण्यात आले. त्या प्ले स्टेशनचे लोकार्पण आज डॉ. देखणे यांचे हस्ते करण्या आले. या प्रसंगी बालाजी अमाईन्स लि चे सह व्यवस्थापकीय संचालक एन. राजेश्वर रेडडी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
बालाजी अमाईन्स च्या वतीने बसवण्यात आलेल्या मल्टिसिस्टम प्ले सिस्टम मध्ये (झोपाळे, घसरगुंडी क्लयमर विविध खेळणी एकाच ठिकाणी आहेत, याचे आज लोकार्पण करण्यात आले बालाजी अमाईन्स च्या वतीने मल्टि अॅक्टीव्हीटी प्ले स्टेशन मध्ये स्लायडर स्लाईड, डबल व्हेव, स्लाईड, रॉक क्लायमर, पॉड, क्लायमर, प्लेन ब्रिज, स्प्रिंग ब्रिज,एस ग्रुप क्लायमर, अबकस रेलिंग, विविध प्रकारानी सजलेले प्ले स्टेशन सोलापूरात प्रथमच एका बागेत बसवण्याचे काम बालाजी अमाईन्सच्या सी एस आर अंतर्गत करण्यात आल्याचे एन. राजेश्वर रेड्डी यांनी यावेळी सांगितले.
प्ले स्टेशन मुळे दिशा-विहार प्रतिष्ठान च्या बागेचे नविन रूप आले. याबद्दल डॉ. देखणे व क्षत्रिय यांनी बालाजी अमाईन्स चे आभार मानले. या कार्यक्रमास बिराजदार सर, प्रसाद संजेकर, डॉ. देखणे, सुनील क्षत्रीय, अॅड. शहा, अशोक गांधी, बावधनकर, अनिल भिसे, साई मूर्ती, संजय पगडाल, आयगोळे, सौ. गांधी, सौ. आयगोळे, सौ. जोग, प्रमोद शास्त्री, सुभाष शास्त्री इत्यादी मान्यवर उपस्थित होते.