सोलापूर : आदर्श क्रीडा मंडळ शेवतेचा ओंकार उपासे व अर्धनारी नटेश्वर वेळापूरची अनुष्का पवार यांची जिल्हा किशोर व किशोरी संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. समृद्धी स्पोर्ट क्लबची श्रद्धा हनमगोंडा व रुक्माई क्रीडा मंडळाचा संदीप मरिआईवाले हे उपकर्णधार असतील. जय जवान जय किसान सैनिक स्कूलच्या मैदानावर झालेल्या जिल्हा स्पर्धेतून अंतिम संघ सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस ए. बी. संगवे यांनी घोषित केले.
हे संघ निवड समिती सदस्य गोकुळ कांबळे तुळशीराम शेतसंदी व अजित बनकर यांनी निवडले. हे संघ चिंचणी (पालघर) येथे ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राज्य अजिंक्यपद किशोर स्पर्धेत भाग घेतील. दोन्ही संघास असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकांत ढेपे, सुनील चव्हाण, सहसचिव राजाराम शितोळे, तांत्रिक समिती सचिव उमाकांत गायकवाड, खजिनदार श्रीरंग बनसोडे, मुख्याध्यापक पुंडलिकल कलखांबकर आदी उपस्थित होते.
संघ -किशोर : संस्कार शिंदे, ओंकार उपासे, रोहन मोरे ( आदर्श क्रीडा मंडळ शेवते ), नामदेव राऊत,चैतन्य शेणमारे ( नरखेड, मोहोळ), पृथ्वीराज भाकरे, श्लोक खुडे( लोकविकास वेळापूर), मयुरेश निंबाळकर (आढीव, पंढरपूर), कार्तिक पवार, श्रावण राऊत ( न्यू सोलापूर), अभिषेक राठोड( दिन बंधू मंद्रूप), संदीप मरिआईवाले, कुणाल राठोड( रुक्माई क्रीडा मंडळ ), कृष्णा मरिआईवाले ( न्यू गोल्डन मंद्रूप), रोहन आनंदपुरे( डोणज), प्रशिक्षक : महेश चव्हाण, संघ व्यवस्थापक : सतीश राठोड.
किशोरी : अनुष्का पवार(कर्णधार), वैष्णवी कुदळे, अन्वयी मंडले( अर्धनारी नटेश्वर, वेळापूर), कल्याणी लामकाने, समृद्धी सुरवसे, स्नेहा लामकाने, श्रावणी देठे( कल्याणराव काळे स्पोर्ट क्लब वाडीकुरोली, पंढरपूर), गौरी कोळवले, प्रणाली चव्हाण ( विकास विद्यालय अजनाळे), अक्षरा मोरे, कीर्ती काटे( साकत प्रशाला बार्शी), इशा गोगावे (रुक्माई क्रीडा मंडळ), श्रद्धा हनमगोंडा( समृद्धी स्पोर्ट क्लब), सौम्या सोलापुरे( न्यू सोलापूर क्लब). रिया चव्हाण( उत्कर्ष क्रीडा मंडळ). प्रशिक्षक : सुनील चव्हाण, संघ
व्यवस्थापक : सोनाली शिंदे-यादव