Type Here to Get Search Results !

सराईत घरफोड्याच्या ताब्यातून १.९७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत



सोलापूर : सोलापूर शहरात मालाविषयक गुन्हे घडत असल्याने ते गुन्हे उघडकीस आणण्यासंबंधी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार  गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी प्रयत्नशील होते. शुक्रवारी,२४ नोव्हेंबर रोजी स.पो.नि. संदिप पाटील व पथकास मिळालेल्या माहितीनुसार घरफोडी चोरी गुन्ह्यातील 'पाहिजे' आरोपी गुड्या पवार (रा. मोहोळ) याला चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने विक्रीसाठीच्या प्रयत्नात असताना जुना कारंबा नाका येथे ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या ताब्यात १.९७ लाख रुपयांचा किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

राजू ऊर्फ गुड्या मधुकर पवार, (वय-२५ वर्षे, रा. पेनुर, ता. मोहोळ) यास ताब्यात घेतल्यावर स.पो.नि. पाटील व त्यांचे पथकाने, कौशल्यपूर्वक तपासात नमूद महिलेने ऑगस्ट-२०२३ ते नोव्हेंबर-२०२३ या कालावधीत त्याच्या आणखीन एका साथीदारासह सोलापूर शहरातील दिवसा-रात्री बंद घर फोडल्याचे तसेच उघड्या घरात चोरी व शेळी चोरी केल्याचीही कबुली दिली. त्यानुसार ०७ गुन्हे उघडकीस आणून ५८ ग्रॅम सोन्याचे दागिने व ३२५ ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण १.९७ लाख रुपयांचा किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

त्याचबरोबर आरोपी राजू ऊर्फ गुड्या मधुकर पवार (वय-२५ वर्षे) हा एमआयडीसी, विजापूर नाका, फौजदार चावडी आणि जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडील ०७ गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. संदिप पाटील, पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, सुभाष मुंढे, शैलेश बुगड, वसीम शेख, चालक ठोकळ यांनी पार पाडली.