सोलापूर : भारतीय संविधान दिवस व २६/११ दहशतवादी हल्ल्यात देशाच्या संरक्षणार्थ शहिद झालेल्या देशाच्या सुपुत्रांच्या स्मरणार्थ, मसिहा सामजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दर वर्षाप्रमाणे ह्या वर्षीही २६ नोव्हेंबर रोजी मसिहा चौक येथे सकाळपासून ते संध्याकाळी ०५.३० वा. पर्यंत मसिहा चौक, मोदी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २३३ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर तसेच सोलापुर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीराचा प्रारंभ माजी आमदार नरसय्या आडम, माजी नगरसेविका कामिनी आडम हस्ते शहिदांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले. सदर शिबीराअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरजूंना वर्षभरामध्ये संस्थेच्या वतीने दोन्ही रक्तपेढ्यांच्या सहयोगाने विनामूल्य रक्ताचे पॅकेट्स पुरवले जातात.
संस्थेचे संस्थापक अमित मंचले यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या शिबीरात रक्त संकलनाचा नवा उच्चांक झाला.२३३ रक्तदात्यांनी स्वयं स्फूर्तीने रक्तदान केल्याने आपण हा टप्पा गाठू शकलो, अशी माहिती अमित मंचले यांनी दिली. हे शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सोलापुर तसेच सोलापुर ब्लड बँक, मसिहा तरूण मंडळ सहकारी मित्रवर्ग यांचे सहकार्य लाभल्याचेही अमित मंचले यांनी सांगताना सर्व रक्तदात्यांचेही आभार मानले.
संविधान दिवस व २६/११ च्या शहिदांच्या स्मरणार्थ शिबिरात २३३ रक्तदात्यांचे रक्तदान
नोव्हेंबर २९, २०२३